‘सनस्टोन’चे ‘अॅडव्हान्टेज’ आता पुण्यातील तीन विद्यापीठांमध्ये उपलब्ध

पुणे : भारतात उच्च शिक्षणाची सेवा पुरविणाऱ्या संस्थांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या आणि २५ शहरांतील ३०हून अधिक संस्थांमध्ये अस्तित्व असणाऱ्या ‘सनस्टोन’ या संस्थेने पुण्यातील तीन विद्यापीठांमध्ये आपली सेवा पुरविण्याचे ठरविले आहे. ही महाविद्यालये ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’द्वारे (एआयसीटीई) मान्यता मिळालेली आहेत, तसेच महाराष्ट्र राज्य सरकारशी संलग्न आहेत. आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – पीजीडीएम; अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ; आणि पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन ही ती विद्यापीठे होत.

याबरोबरच ‘सनस्टोन’चे ‘अॅडव्हान्टेजेस’ आता आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – पीजीडीएममधील पीजीडीएम अभ्यासक्रमांमध्ये उपलब्ध होतील; तसेच अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए हे अभ्यासक्रम आणि एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनचे पीजीडीएम इन मार्केटिंग फॉर डिजिटल बोर्ड व पीजीडीएम इन फायनान्स फॉर न्यू-एज इकॉनॉमी या अभ्यासक्रमांमध्येही उपलब्ध होतील.

‘सनस्टोन’च्या ‘अॅडव्हान्टेजेस’मुळे उद्योग-संबंधी शिक्षण आणि कौशल्याधारीत अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यास विद्यार्थी सक्षम होतात आणि ते महाविद्यालयीन स्तरावरच नोकरीसाठी सज्ज होतात. या समावेशामुळे विद्यार्थ्यांना सनस्टोनच्या एक हजाराहून अधिक रिक्रूटर्सचे मजबूत नेटवर्क आणि २ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. अनेक नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या संधी त्यांना मिळू शकतात.

उच्च शिक्षणाची आकांक्षा असलेले अनेक विद्यार्थी राज्यभरातून पुण्यात येत असतात. उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यावर सरकार सतत भर देते, तसेच त्याकरीता प्रयत्नही करते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील शिक्षणप्रणाली स्वतःमध्ये सुधारणा करत आहे.

‘सनस्टोन’चे सह-संस्थापक आणि सीओओ पीयूष नांगरू हे या प्रसंगी म्हणाले, “पुण्यातील तीन विद्यापीठांमध्ये ‘सनस्टोन’चे ‘अॅडव्हान्टेज’ देताना आम्हाला आनंद होत आहे. उत्साही व क्षमता असणाऱ्या तरुणांची मोठी संख्या भारतातील अनेक शहरांमध्ये आहे. त्यांना मिळणाऱ्या शिक्षणातील गुणवत्तेची व संधींची तफावत कमी करणे आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता पूर्ण करण्यात मदत करणे, हे ‘सनस्टोन’मध्ये आमचे उद्दिष्ट आहे.

‘सनस्टोन’च्या ‘एज’मुळे विद्यार्थ्यांना प्रगत अभ्यासक्रमांची प्रमाणपत्रे मिळवून उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाचा पुरेपूर लाभ करून घेणे, उद्योगांमध्ये व प्रकल्पांमध्ये शिकाऊ उमेदवारी करण्यासाठी नावनोंदणी करणे, उच्च-मागणी असलेली तांत्रिक कौशल्ये शिकणे आणि स्वतःसाठी एक व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार करणे यांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात.

Leave a Reply

%d bloggers like this: