महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या तीन दीवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी बंड करीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलय. परंतु आज एका प्रसार मांध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक प्रतिक्रिया देवून ‘अद्याप महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आज (दी. 24) सकाळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी फोनवरून आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांवर कारवाई करणे हे बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाची भूमिका चुकीची आहे. आमच्या मागे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महाशक्ती आहे. कोणाची शिवसेना मुळ शिवसेना याबाबद आम्ही कधीच चर्चा किंवा उल्लेख केलेला नाही, असेही शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे गटाच्या दुपारच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो यांची वाट पहावी लागेल.

 

Leave a Reply

%d bloggers like this: