fbpx
Thursday, September 28, 2023
BusinessLatest NewsPUNE

पुण्यामध्ये पुन्हा एकदा झळकणार YOO चे वास्तूसौंदर्य

पुणे : ट्रायबेका डेव्हलपर्स (Tribeca Developers) आणि ट्रायकॉन इन्फ्रा बिल्डटेक प्रा. लि. (TriconInfra Buildtech Pvt. Ltd.) यांनी आज एनआयबीएम रोडदक्षिण पुणे येथे “YOO ONE” या आलिशान निवासी प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा केली. हा प्रकल्प म्हणजे सुप्रसिद्ध YOO ब्रॅण्डच्या दक्षिण पुण्यातील प्रवेशाची नांदी असणार आहे तर संपूर्ण जगातील सर्वाधिक YOO ब्रॅण्डेड प्रॉपर्टीज असलेल्या पुणे शहरातील हा तिसरा YOO प्रकल्प असणार आहे. सुझॅन खान फॉर YOO या प्रकल्पाच्या इंटिरिअर डिझायनर असणार आहेत.

द आर्क या १८ लाख चौरस फुटांच्या क्षेत्रावर उभारल्या गेलेल्या प्रकल्पाच्या रूपात ट्रायबेकाने शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर १८ महिन्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. मिश्र वापरासाठीच्या विकास प्रकल्पातील जागा अत्यंत वेगानेअवघ्या १५ महिन्यांमध्ये ४५० कोटी रुपयांहून अधिक किंमतीला विकल्या गेल्या होत्या.

YOO पुणे आणि YOO व्हिलाजच्या माध्यमातून २०१२ मध्ये शहरात पदार्पण करणा-या YOO ब्रॅण्डला पुण्याच्या उच्चभ्रू वर्गाची मोठी मागणी असल्याचे दिसते. हे दोन्ही प्रकल्प पुण्यातील सर्वात मोठे विकासक असलेल्या पंचशील रिअल्टीद्वारे साकारण्यात आले होते. तर ट्रायबेका ही आलीशानब्रॅण्डेड निवासी जागांच्या क्षेत्रातील एक अनुभवी स्पर्धाशील कंपनी असून ट्रम्प ऑर्गनायझेशन खालोखाल ट्रम्प ब्रॅण्डेड मालमत्तांची ती सर्वात मोठी विकासक कंपनी आहे.

काच व झिंक यांची अप्रतिम दर्शनी बाजू असणारे व एका बाजूला २०० एकरांचे संरक्षित जंगल तर दुसया बाजूला सह्याद्री पर्वतरांगा यांचे विहंगम दृश्य दिसेल असे टॉवर्स ही YOO ONE ची खास ओळख असणार आहे. रचनासौंदर्य हे येथील निवासी जागांच्या केंद्रस्थानी आहे. येथील प्रत्येक खोलीमध्ये जमिनीपासून छतापर्यंत पोहोचलेल्या महागड्या खिडक्यांमधून येणारा उजेड या घरांना नैसर्गिक प्रकाशाने भरून टाकतो व शहरलगतचे जंगल आणि सह्याद्री यांचे मनोहारी दर्शन घडवतो.

येथील रहिवाशांना १.५ एकर जागेवर पसरलेल्या रूफटॉप टेरेसवर आणि YOO ONE क्लबच्या माध्यमातून इन्फिनिटी पूलस्पा अँड फिटनेस सेंटर विथ सौनास्टीम आणि मसाज रूम, लायब्ररीलाउंजगेम्स रूमलहान मुलांचा प्ले एरियाएक फाइन-डाइन रेस्टॉरंट आणि बिझनेस सेंटर अशा अनेक आलिशान सोयीसुविधांचा आनंद उपभोगता येणार आहे. या इमारतीसाठी काटेकोरपणे निवडला गेलेला कर्मचारीवर्ग रहिवाशांना इन-रेसिडन्स केटरिंगघरगुती कामांसाठीची मदत२४ तास डोअरमॅन आणि व्हॅले पार्किंग सेवा पुरवेल.

YOO ONE या प्रकल्पाची अंदाजित किंमत रु. ४५० कोटी रुपये इतकी असून यात १.९ कोटी रुपयांपासून ते ३.६ कोटी रुपयांपर्यंत किंमतीची ३ व ४ बेडरूम घरे उपलब्ध आहेत.

ट्रायबेकाचे संस्थापक कल्पेश मेहता म्हणाले, एक विलक्षण ठिकाण आणि एक उत्कृष्ट ब्रॅण्ड यांनी एकत्र येऊन खरोखरीच काहीतरी भव्यदिव्य उभारल्याच्या काही अत्यंत मोजक्या घटनांपैकी ही एक घटना आहे. निव्वळ आराखडा तयार करण्यासाठी १२ महिने घेतल्यानंतरअचूकता साधण्याच्या असंख्य प्रयत्नांनंतर आम्ही केलेल्या या निर्मितीचा मला प्रचंड अभिमान वाटत आहे. YOO ONE हा प्रकल्प सर्व अपेक्षांच्या पार जाणारा आहे. हा प्रकल्प म्हणजे केवळ निवडक लोकांसाठीच घर नसेल तर पुणे शहरातील ते एक मानचिन्ह असेल.

YOO ग्रुपचे चेअरमन जॉन हिचकॉक्स म्हणाले, YOO ONE च्या उद्घाटनाच्या घोषणेहून आणि ट्रायबेका व ट्रायकॉनच्या साथीने काम करण्याहून अधिक आनंददायी आमच्यासाठी काहीही नाही – YOO साठी ही आणखी एक थोर भागीदारी आहे. चांगल्या वास्तूरचनेमुळे जगण्याला एक आगळी उंची प्राप्त होते आणि आमच्या सर्वच प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही याच गोष्टीशी कटिबद्ध आहोतआणि या नव्या विलक्षण इमारतीमधील घरांना आपल्या समकालीन शैलीतील अभिजाततेचा स्पर्श देणा-या सुझॅन खान यांच्याबरोबर काम करण्यासाठी तर आम्ही विशेष उत्सुक आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: