सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण – महाराष्ट्रात याची काय लिंक आहे, याचा तपास सुरू आहे – अभिनव देशमुख
पुणे : नारायणगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे सिद्धू मुसेवाला हत्येशी कनेक्शन आहे.
संतोष जाधवच्या दोन सहकाऱ्यांना आज नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोठा पिस्तूलाचा साठा जप्त करण्यात आला. 13 बंदुकी आणि मोबाइल जप्त करण्यात आलेत तसेच एक गाडीही जप्त करण्यात आली आहे. जीवनसिंग नहार आणि त्याच्या साथीदाराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष जाधव आणि बिष्नोई गँगची काही मुले ही मध्य प्रदेशला पाठवली होती आणि तिथून ही आणण्यात आली आहेत. महाराष्ट्रात याची काय लिंक आहे, याचा तपास सुरू आहे.अशि माहिती पुणे ग्रामीण पोलीस चे अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
अभिनव देशमुख म्हणाले, संतोष जाधव याचे लॉरेन्स बिष्नोई गँगशी संबंध आहेत. हे त्याने कबूल केले आहे. पंजाबमध्ये तो त्याच्या गावी जाऊनही आला आहे, पण शूटर्स कोण होते याचा तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. राण्या बाणखेले हत्या प्रकरणातील मुख्य आणि सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशय आरोपी संतोष जाधववर नारायणगाव पोलिसांत नव्याने गुन्हा दाखल झाला. खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. पाणी विक्रेत्याला खंडणीची मागणी करण्यात आली होती. संतोष जाधव आणि त्याच्या टोळीतील सहकारी यात होते. जीवनसिंग नहार आणि दूसरा सहकारी यांनी खंडणी मागितली होती. त्यांना मंचर, घोडेगाव या ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे.
की ही शस्त्र जूनमध्ये आली आहेत. संतोष जाधवच्या सांगण्यावरून मुलांनी ही मध्य प्रदेशातून आणली. पंजाब, राजस्थान, हरयाणा राज्यांच्या टीम येऊन गेल्यात. सर्व एजन्सीजना माहिती शेअर करत आहोत. मुसेवाला संदर्भात आतापर्यंत 15 तारखेला त्यांनी डिटेल्स दिली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातून संतोष जाधव, सौरव महाकाळ यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर आज अटक केलेल्या आरोपींचे सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणाशी काही संबंध आहेत का, घटनास्थळी ते उपस्थित होते का.याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
