शालेय पोषण आहाराची कामे बचत गटांना मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन
पुणे : शालेय पोषण आहाराचे काम राज्यातील महिला बचत गटांना मिळावे याकरिता पुणे शहरातील महिला बचत गटांनी सुनील भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षण आयुक्त आणि पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर मूक मोर्चा 10 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात आला.
यावेळी सुरुवातीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा निघाला, मोर्चाला पोलिसांनी सेंट्रल बिल्डिंगच्या मुख्यद्वार जवळ थांबविण्यात आला यावेळी महिला बचत गटाच्या वतीने एक शिष्टमंडळ शिक्षण आयुक्त कार्यालय मध्ये पोलिसांसमवेत शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी श्री राजेश शिंदे सर प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील सर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे उपसंचालक देविदास कुलाल सर अधीक्षक मुळे सर यांच्या बरोबर चर्चा झाली चर्चेअंती महिला बचत गटाच्या वतीने देण्यात आलेल्या विनंती अर्जावर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कोणतीही कारवाई केली नसल्याने त्यांचा निषेध करण्यात आला आणि प्राथमिक शिक्षण संचालकाच्या आदेशावर स्थगितीसाठी दिलेले अर्जाचे पत्र शालेय पोषण आहार विभागाने पुणे महापालिकेचे आयुक्त यांना पत्र पाठविण्यात आले अशा तऱ्हेने प्राथमिक शिक्षण संचालनालय चुकीची कामे करत असल्याचे उघड झाले 2019 ते 22 च्या दरम्यान झालेल्या अटी शर्त भंग केलेल्या ठेकेदार व दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश तात्काळ देत असल्याचे सांगण्यात आले तसेच शालेय पोषण आहार साठी युनिट संख्या पाचशे ते हजार असावी याबाबतचे विनंती पत्र शासनाला तात्काळ पाठविण्याचे सांगण्यात आले यावेळी महिला बचत गटाच्या वतीने चर्चेमध्ये सुनील भाऊ जगताप श्यामराव ससाने नागेश खडके सावित्री बचत महासंघाचे अध्यक्ष जयश्री ढोबळे ,सचिव सायकर उज्वला, शाहीन मुलानी, वत्सला घुले, सुनिता ससाने, या उपस्थित होत्या. जर महिला बचत गटाच्या मोर्चाची दखल तातडीने न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असे स्पष्ट सांगण्यात आले. मोर्चाचे नियोजन सावित्री महिला बचत गट महासंघाच्या सर्व महिला बचत गटांनी व्यवस्थित रित्या केले त्यानंतर पुणे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला मोर्चामध्ये किमान पाचशे ते सातशे महिला होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जयश्री डोबळे ताई , उज्वला सायकर , दाभाडे मावशी , वत्सला घुले , शाहीर मुलानी, सोनटक्के ताई, सुचित्रा नांदगुडे, साधना मिसाळ रंजना इंगळे अश्विनी राऊत प्राची आचेकर उपस्थित होत्या.
