Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय मंत्राचे सामुहिक पठन

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी महामृत्युंजय मंत्राचे सामुहिक पठन करण्यात आले. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा १० जूनला वाढदिवस असल्याने शहरातील विविध भागात भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुसाठी आणि राजकीय कारकीर्दीसाठी माजी सभागृह नेते बिडकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. सोमवार पेठेतील श्री नागेश्वर मंदीर येथे महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये बिडकर हे सपत्नीक, सहभागी झाले होते.

मंत्रोच्चाराच्या स्वरांनी मंदिरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. सोमवार पेठेतील नागरिकांनी हजेरी लावली होती. तेजस सप्तर्षी गुरुजी आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांनी हे पठन केले. यावेळी सागर अफूवाले, उद्धव मराठे, मंदार पवार, सुजित पुजारी, राहुल शर्मा, माऊली शिवले, सोमनाथ शेळके, सुमीत रांबाडे, प्रताप सावंत, दिलीप मामा बहीरट, निलेश अल्हाट, बाला शेख, सुनील बारणे, सुरेखा शिंदे, कल्पना बहीरट, किरण गोसावी, शिल्पा शेळके, बाळासाहेब घोडके, लक्ष्मी घोडके, वैशाली सोनवणे, अनुराधा तळेगावकर यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी इतर कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading