राज्यसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला मान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना
मुंबई : आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.सकाळी ९:०० वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून या निवडणुकीमध्ये मतदानाचा पहिला मान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाला असून सर्वात पहिले मतदान भरणे यांनी केले आहे.
गेली अनेक वर्षे बिनविरोध होणारी निवडणूक २४ वर्षांनंतर मतदानाद्वारे पार पडणार आहे. मतदान झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की,आज राज्यसभेसाठी मतदान होत असून मला पहिले मतदान करण्याचा मान मिळाला आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने पहिलेच मत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाल्याने खऱ्या अर्थानं पाहिला कौल आमच्या बाजूने लागला असून आज दिवसभर महाविकास आघाडीचाच बोलबाला राहणार आहे.महाविकास आघाडीकडे उमेदवार जिंकून येण्यासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ असल्यामुळे आमचे सर्व च्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत हा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
