शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने माहेर संस्था ( अनाथालय ) आव्हाळवाडी येथे फळ वाटप व स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे तसेच अनाथालयातील लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शिवव्याख्याते शेखर पाटील यांच्या शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते,
संभाजी ब्रिगेड पदवीधर मतदारसंघाचे नेते मनोजकुमार गायकवाड व संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या हस्ते जिल्हा सरचिटणीस बाळा थोपटे यांच्या मातोश्री उज्वला बबन थोपटे सौजन्याने संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने गरीब जनतेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले, पदवीधर नेते इंजि मनोजकुमार गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना संभाजी ब्रिगेड चे विचार मांडले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे माहेर संस्थेस ( अनाथालयास ) संभाजी ब्रिगेड च्या वतीने भरीव मदत करण्याची ग्वाही दिली तसेच जनतेच्या आशिर्वादाने जिल्हापरिषदेवर निवडून गेल्यास पुणे जिल्हा परिषदेकडून प्रत्त्येक अनाथालयास मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून संस्थेस मदत करण्यात येईल अशा भावना वेक्त केल्या, माहेर संस्थेचे सागर वावरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, यावेळी कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड पदवीधर चे नेते इंजि. मनोजकुमार गायकवाड, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा सचिव निलेश ढगे, शिरूर लोकसभा अध्यक्ष सुनील वाडेकर, जिल्हा सरचिटणीस सनी थोपटे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, व्यापारी आघाडी अध्यक्ष विवेक कावरे, उपाध्यक्ष आदमभाई तांबोळी, विठ्ठल सुर्यवंशी, सोशल मिडिया उपाध्यक्ष अशोक फाजगे, सागर वावरे, सचिन आहिरे, विनोद देशमुख,आदी पदाधिकारी यांच्या सह माहेर संस्थेचे कर्मचारी पोलीस बांधव,उपस्थित होते,
