Sunday, September 6, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

गायक केके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

कोलकाता : बॉलिवूडमधील अनेक ब्लॉकबस्टर गाण्यांना आपला आवाज देणारे लोकप्रिय गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. कोलकाता येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करत असतानाच यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमात मंचावर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएमआरआय) नेण्यात आले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

केके यांचे मुळ नाव हे कृष्ण कुमार कुन्नथ हे होते. त्यांनी देवदास, आशिकी 2, हम दिल दे चुके सनम आशा 200 हून अधिक गाणी गायली आहेत. ‘तडप तडप के इस दिलसे आह निकलती रही ..’, ‘यारो दोस्ती बडी हसीन है ..’, ‘क्युके तू धडकन मै दिल ..’यांसारख्या अनेक गाणी केके यांच्या आवाजाने आजारामर झाली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading