Friday, October 23, 2026
Latest NewsSports

पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर फारुख आमोनतेव्ह, ग्रँडमास्टर अलेक्झी फेडरोव्ह, ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ता यांची विजयी सलामी 

पुणे: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ एलो2000पेक्षा अधिक रेटिंग खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत  पहिल्या फेरीत ग्रँडमास्टरफारुख आमोनतेव्ह, ग्रँडमास्टर अलेक्झी फेडरोव्ह, ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ता यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत अव्वल मानांकित ग्रँडमास्टर ताजिकिस्तानच्या फारुख अमोतेव्ह याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या अनिश गांधीचा पराभव करून विजयी सलामी दिली. सिसिलियन तंत्राचा उपयोग करीत फारुखने सुरेख सुरुवात केली आणि डावाच्या मध्यास खेळावर नियंत्रण मिळवीत आपल्या प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ केले.

दुसऱ्या सामन्यात चौथ्या मानांकित अलेक्झी फेडरोव्हने महिला ग्रँडमास्टर तेजस्विनी सागरचा पराभव केला.  ग्रँडमास्टर जीएम दीप सेनगुप्ताने अतुल डहाळेचा तर, ग्रँडमास्टर व्ही कार्तिकने अंजनेया फाठकचा पराभव केला.

निकाल: पहिली फेरी(व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार):
जीएम फारुख  आमोनतेव्ह (ताजिकिस्तान)(1)वि.वि.अनिश गांधी(भारत)(0);
डब्लूजीएम तेजस्विनी सागर(0)पराभूत वि.जीएम अलेक्झी फेडरोव्ह(1);
जीएम दीप सेनगुप्ता(1)वि.वि.अतुल डहाळे(0);
अंजनेया फाठक(0)पराभूत वि.जीएम व्ही कार्तिक(1);
जीएम मिहेल निकीटेंको(1)वि.वि.सीएम मनीषा कदम(0);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading