सामान्य माणसाचा उर फाटणारा आकांत भाजप ला दिसत नाही हे धक्कादायक आहे – आप आदमी पार्टी


पुणे:अमेरिकेपेक्षा भारतात कमी महागाई असल्याचा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुण्यात केला. भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात हा दावा केला असल्याने जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या पदाधिकार्यांचे उर कदाचित भरून आले असणार परंतु आज हजार रुपये झालेला घरगुती गस सिलिंडर आणि शंभरी ओलांडलेले पेट्रोल दर बघून सामान्य माणसाचा उर फाटणारा आकांत भाजप ला दिसत नाही हे धक्कादायक आहे अशी टीका आप चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे.

भारताच्या तुलनेत पाश्चिमात्य देशातील सरासरी उत्पन्न उपासमारीच्या पातळीच्या बरेच वर असल्याने त्याचा फटका जेवढा भारतीय माणसाला बसतो आहे तेवढा निश्चितच अमेरिकन माणसाला बसत नाही.
दुसरी बाब म्हणजे आर्थिक विषमता असल्याने भारतातील गरीबाला लागत असलेली महागाईची झळ अमेरिकेच्या नव्हे तर भारतातील अडाणी अंबानी गटाला लागणार नाही इतकी प्रचंड आर्थिक दरी गेल्या काही वर्षात निर्माण झाली आहे. दारिद्र्य रेषेखाली मोठा समाज असून दिर्घकालीन दारिद्र्य असलेल्या भारतात जोडीला आपत्कालीन दारिद्र्य आले आहे. परंतु या महागाई ग्रस्तांविषयी आत्मीयता भाजपला नाही असेच या असंवेदनशील विधानावरून दिसते आहे असे आम आदमी पार्टीने म्हंटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: