‘त्या’ वक्तव्यावर पक्षातील नेत्यांना योग्य त्या सूचना दिल्या: शरद पवार

पुणे: एखाद्या नेत्याच्या वक्तव्याबद्दल समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते, गैरसमज होऊ शकतो, तो दूर करणे ही आपली जबाबदारी आहे.
ब्राह्मण समाजाविषयी आपल्या सहकाऱ्यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांना योग्य ती समज देण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप झाल्यानंतर शरद पवारांनी राज्यातल्या विविध ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी बोलवलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून माझ्या काही सहकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी होती. मी आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना बैठक आयोजित करायला सांगितले होते. या बैठकीत अनेक ब्राह्मण संघटना बैठकीला हजर होत्या. आपल्या पक्षातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अस्वस्थता होती. पुन्हा या पद्धतीने कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात बोलू नये अशा सूचना आपण त्यांना दिल्या आहेत. धोरणांच्या विरोधात बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे.
शरद पवार म्हणाले की, अलिकडच्या काळात ग्रामीण भागातला हा वर्ग नागरी भागात येतोय. त्यामुळे नोकरीमध्ये त्यांना अधिक संधी मिळावी. त्यासाठी आरक्षणाची गरज असल्याची मागणी ब्राह्मण समाजाने केली. त्यावेळी त्यांना आरक्षणाचे सूत्र समजावून सांगितलं. पण इतरांच्या आरक्षणाला विरोध करु नये असं मी आवाहन केलं. विविध समाजासाठी विकासाला, व्यवसायाला मदत करण्यासाठी महामंडळ स्थापण करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी परशुराम महामंडळ असं नावही सूचवण्यात आलं. तेव्हा हा विषय आपल्या अधिकारात नाही, तो राज्याकडे आहे. असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: