Monday, October 26, 2026
Latest NewsPUNE

पुण्याची संस्कृती खराब करण्याचा एककलमी प्लॅन भाजपने केला काँग्रेसचा आरोप

पुणे : बालगंधर्व रंगमंदिर वाचवण्यासाठी काँग्रेसने ‘बालगंधर्व बचाव बालगंधर्व जवळ आंदोलन’ केले.
बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे सौंदर्य आहे. ते पाडून पुण्याचे सौंदर्यावर घाला घालू नये. पुण्याची संस्कृती टिकलीच पाहिजे.बाल गंधर्व रंग मंदिर हे पाडू देणार नाही केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी पुनर्वसनाचा घाट सत्ताधारी करत आहेत असा आरोप काँग्रेसने आंदोलनात केला.

या आंदोलनाच्या वेळी बालगंधर्व बचाव अशा मोठमोठ्याने घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे ,माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा पूजा आनंद, पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश बागवे म्हणाले,बालगंधर्व रंगमंदिर सभागृह पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेने गेल्या काही वर्षांपूर्वी मांडला आहे. तो प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. महापालिका जोपर्यंत हा प्रस्ताव मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचे काँग्रेसने यावेळी सांगितले. पुण्याची संस्कृती खराब करण्याचा एककलमी प्लॅन भाजपने केला आहे. याला काँग्रेसचा विरोध असेल. असे रमेश बागवे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading