पुढील पाच दिवस कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
पुणे : मान्सून वेळे आधीच देशात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार नैऋत्य मान्सूनची आगेकूच सुरू असून पुढील चार ते पाच दिवसात कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, नैऋत्य मान्सूनने संपूर्ण अंदमान निकोबार बेट, संपूर्ण अंदमान समुद्र किनारा व्यापला आहे. दक्षिण – पूर्व व पूर्व – मध्य बंगाल उपसागरा मान्सून पुढे सरकला आहे. त्यामुळे पूढी पाच दिवस कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भात काही भागात उष्णतेची लाट
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी कींचीत वाढ झाली आहे. उर्वरीत राज्यात कमाल तापमानात कमाल तापमान सारसरीच्या जवळपास आहे. मात्र पुढील काही दिवसांत विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
18 May;
पुढील ४,५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
-IMD pic.twitter.com/8C0k7x9QIX— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 18, 2022
18 May:#SWMonsoon has further advanced into some more parts of SE BoB, entire A& N Islands,entire Andaman Sea & some more parts of EC B0B
नैऋत्य मान्सून संपूर्ण अंदमान निकोबार बेटे,संपूर्ण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व / पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकला pic.twitter.com/48qa5jN9Uy
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 18, 2022
