Saturday, October 24, 2026
BusinessLatest News

पर्यावरणपूरक बॅगची निर्मिती करुन पुण्याची सेफपॅक इंडस्ट्रीज लिमिटेड जगात अव्वल

जागतिक पॅकेजिंग स्पर्धेमध्ये भारत सन्मानित ; साडेचार वर्षे संशोधन करुन प्लास्टिकला पर्यायी गंज विरोधक सेफकंपोस्ट बॅगची निर्मिती

पुणे : प्लास्टिकचा पर्यावरणाला होणारा धोका ओळखून पुण्यातील सेफपॅक या कंपनीने साडेचार वर्षे संशोधन करून संपूर्णपणे विघटित होणारी , गंज विरोधक आणि प्लास्टिकला पर्यायी बॅग सेफकंपोस्ट तयार केली आहे. या पर्यावरणपूरक बॅगला मिलान इटली येथे झालेल्या जागतिक अत्युत्तम पॅकेजिंग स्पर्धेमध्ये प्रेसिडेंट ब्राँझ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तब्बल ३७ देशातून ४४० जागतिक अव्वल कंपन्यांनी आपली संशोधन केलेली उत्पादने स्पर्धेमध्ये सादर केली होती. त्यामध्ये यंदाचा वर्ल्ड स्टार ग्लोबल पॅकेजिंग अवॅार्ड बरोबरच सर्वोच्च प्रेसिडेंट ब्राँझ पदकाचा मानकरी हा भारत देश ठरला आहे, विशेष म्हणजे भारताला प्रथमच पॅकेजिंगच्या संशोधन क्षेत्रात प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला आहे.

सेफपॅकच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र तापडिया व डायरेक्टर अंजली तापडिया यांनी हा सन्मान वर्ल्ड पॅकेजिंग ऑर्गनायझेशनचे जागतिक प्रेसिडेंट पियर यांच्याकडून स्विकारला. वर्ल्ड पॅकेजिंग ऑर्गनायझेशन ही जागतिक पॅकेजिंग इंडस्ट्रीची सर्वोच्च संस्था आहे. संस्थेतर्फे नव संशोधित प्रॉडक्टची जागतिक स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते.

राजेंद्र तापडिया म्हणाले ,माझे वडील स्वर्गीय भगीरथ तापडिया यांचे स्वप्न ‘ भारताने जगासाठी नवनिर्मित उत्पादन बनवावे’ हे आज साकार झाले याचा आम्हाला आनंद आहे. जगभरातील इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात विघटन न होणारे प्लास्टीक वापरले जाते,त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. संपूर्णपणे विघटित होणाऱ्या प्लास्टिक बरोबरच ऑटोमोबाईल कंपन्यांना लागणाऱ्या गंज विरोधक बॅग्स या पण कंपोस्ट असण्याची आवश्यकता निर्माण झाली व त्यामध्ये सखोल अभ्यास करून विघटित होण्याबरोबरच गंज विरोध करणारी बॅग तयार करण्यास सेफपॅक संशोधकांना यश आले आहे. सेफकंपोस्ट या पूर्णपणे विघटीत होणाऱ्या पर्यावरणपूरक बॅगचा अधिकाधिक वापर येत्या काळात भारतासह जगभरात होईल, आणि त्या माध्यमातून पर्यावरणाची हानी होण्याचे प्रमाण कमी होईल.

पुण्यातील सेफपॅक इंडस्ट्रीज लिमिटेड ही ५० वर्षापासून स्पेशलिटी पॅकेजिंगमध्ये गंज विरोधक वस्तूंचे संशोधन करुन जगभरामध्ये ४० देशांमध्ये निर्यात करते. ज्यामध्ये अमेरिका ,युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया देशांचा समावेश आहे. जपानच्या कंपनीने सेफपॅक चे प्रॉडक्ट हे जगात सर्वोत्तम आहेत असे लेखी प्रमाणित केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading