fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते आपआपसातच भिडले; बैठकीवरुन झाला वाद

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात शनिवारी होणारी सभा रद्द झाली आहे तर दुसरीकडे पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते आपआपसातच भिडले आहेत. पुण्यातील शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष आणि मनसैनिकामध्ये झटापट झाली आहे. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर याच्यात हाणामारी झाली आहे.

रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असूनही मनसेच्या कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब विटकर यांनी बैठकीत शिरोळे यांना विचारला. त्यानंतर शिरोळे हे विटकर यांच्यावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्येही झटापट झाली. यावेळी पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या पुण्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांसमोर हा वाद झाला. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंबंधी नाव नोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हे भांडण झाले. पुण्यातले हे मनसैनिक आपआपसात भिडले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading