मनसेतील अंर्तगत  वाद :  शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून वसंत मोरे याचं नाव वगळले


पुणे: शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीमधून मनसे नेते वसंत मोरे  यांचे नाव वगळण्यात आले आहे.
वसंत मोरे हेकोअर कमिटीचे सदस्य असतांनाही नाव वगळण्यात आलं आहे. नाव वगळण्यात आल्याने वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील काही स्थानिक नेते हे जाणून बुजून करत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. पत्रिकेत नाव वगळण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे. स्थानिक नेत्यांनी जाणूनबुजून नाव वगळले आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र मी आजही राजमार्गावर आहे कायम राहणार असल्यचेची वसंत मोरे यांनी बोलून दाखवले आहे. यामुळे मनसेतील अंर्तगत वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे.
काही माध्यम प्रतिनिधींनी वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,पक्षात शहर पातळीवर मला टाळले जात आहे, अशी जाहीर नाराजी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी केली आहे. मी कोणालाही टाळत नाही, मात्र मला टाळले जात आहे.असे ते म्हणाले आहेत . 
विषय मुद्दाम केला गेला आहे. अशा कार्यक्रमातून मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनात
वसंत मोरे म्हणाले ,माझ्याविषयी राग निर्माण झाला पाहिजे म्हणून अशा गोष्टी केल्या जात आहेत.” अशा शब्दांत आपला रोष व्यक्त करत ते म्हणाले की, “ही गोष्ट अजून मी राज साहेबांपर्यंत पोहचवली नाही. पण ही गोष्ट शहरातील सिनिअर लोकांपर्यंत पोहचवली आहे. राज साहेबांच्या मागे खूप कामं आहेत, असल्या चिल्लर कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. असं म्हणत वसंत मोरे यांनी शहरातील नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: