भारतात दोन दिवस उष्णतेची लाट

पुणे : वाढते तापमान आणि ढगाळ हवामानामुळे आधीच वातावरणात भयंकर उकाडा जाणवत आहे. त्यातच आता भारतीय हवामान खात्याने (IMD) दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. IMDने दिलेल्या माहितीनुसार 14 आणि 15 मे रोजी भारतात उष्णतेची लाट असणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या वायव्य आणि मध्य भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहील आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल.

दरम्यान, पुढील दोन दिवसांत भारताच्या पूर्व भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये शनिवारपासून तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 14 मे रोजी पूर्व राजस्थानमध्ये आणि 15 मे रोजी राजस्थानच्या इतर भागात उष्णतेच्या लाट असेल. 14 मे रोजी  उत्तर प्रदेशमधील पश्चिम भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट असेल. तर  पंजाबमध्ये 15 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार  आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: