Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचा पूर्वाध रंगला सतार वादन आणि नृत्याने

संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवा’चा दुसरा दिवस सतार वादन आणि नृत्याने रंगला. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा दोन दिवसीय महोत्सव पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी संवादिनी वादक पं. शारंगधर साठे म्हणाले, पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने मोठे संगीतज्ञ आपण गमावले आहे. संतुरसारखे लोकवाद्य त्यांनी जगभरात पोहोचवले. शास्रीय संगीतापासून ते चित्रपटातील गाण्यांसाठी त्यांनी सं​तू​​र वादन केले. संतुर वादनात त्यांनी वैविध्यताही जपली. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

महोत्सवाचा दुसरा दिवस विलायत खानी घराण्याचे पं. मारुती पाटील यांच्या सतारवादनाने सुरू झाला. राग मारवाने त्यांनी वादनाला सुरुवात केली. त्यानंतर राग बसंत सादर केला. उस्ताद विलायत खान यांची गत तीन तालात सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांना तबला साथ चारुदत्त फडके यांनी दिली तर तानपुरा साथ धनश्री भडकमकर यांनी दिली.

त्यानंतर प्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचे नृत्य सादर झाले. यावेळी जनेमीस आणि त्यांच्या समुहाने नृत्यवंदना सादर केली. यामध्ये पहिल्या अंतऱ्यात स्थल, काल, ऊर्जा या नृत्याच्या तत्वांना अभिवादन करण्यात आले. दुसऱ्या अंतऱ्यात स्वर, लय, ताल आणि वाद्यवृंदाला अभिवादन करण्यात आले आणि शेवटच्या अंतऱ्यात नृत्याची देवता नटराजाला वंदन करण्यात आले. याची संगीतरचना चैतन्य कुंटे यांची होती​​. यानंतर सोळा मात्रांचा ताल तीन ताल सादर केला. ​यानंतर तबला वादक निखिल फाटक यांच्या साथीने तिहाई सादर झाली. यानंतर आपल्या गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडून मिळालेली जयपूर घराण्याची बंदिश सादर केली. ​यावेळी तबला साथ निखिल फाटक, संवादिनी साथ यशवंत थिटे आणि पढंत साथ जुई सगदेव यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading