fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

‘शाहू महाराजांचे जीवन व कार्य ‘ वरील चित्ररथाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

लोकराजाप्रति 100 सेकंद स्तब्धतेची नोंद इतिहासात होईल

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर तयार करण्यात आलेल्या सुबक कलाकृतींवरील चित्ररथांच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा सर्वत्र जागर होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत ‘शाहू महाराजांचे जीवन व कार्य’ यावर आधारित चित्ररथ मिरवणूकीचे उद्घाटन पालकमंत्री सतेज डी. पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून शाहू मिल येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रमुख उपस्थित होते.

यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापुरकर, अर्थ मुव्हर्स असोसिएशनचे रवी पाटील, बांधकाम व्यवसायिक अजयसिंह व्ही. देसाई , बांधकाम व्यवसायिक श्री बिल्डर्स व डेव्हलपर्सचे कृष्णात पाटील, सूरज इस्टेट डेव्हलपर्सचे राजूभाई पारीख, आयडील ग्रुप चे अतुल पोवार, वरद डेव्हलपर्स चे संजय चव्हाण, अनंत खासबारदार, प्राचार्य अजेय दळवी, डॉ.संदीप पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, लोककल्याणकारी शाहू महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात आले. या दरम्यान घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमाबद्दल सर्व थरातून नागरिकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. शाहू महाराजांच्या स्मृती दिनी जिल्ह्यातील नागरिकांनी लोकराजाला मानवंदना दिली. लोकराजाप्रति सर्वजण 100 सेकंद नतमस्तक झाल्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल.

पन्हाळा मुख्य रस्ता सुरु झाल्यामुळे पर्यटकांची रीघ वाढली आहे. पर जिल्ह्यातून पन्हाळ्यावर येणाऱ्या पर्यटकांना शाहू महाराजांच्या कार्याची ओळख करुन देण्यासाठी एखाद्या रविवारी संपूर्ण दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading