इन्स्टामोजोने पुणे स्थित अनाहत म्युझिक थेरपीचे केले डिजिटलीकरण: संगीत आणि आरोग्य यांचा मेळ

पुणे : संगीत आणि आरोग्य यांचा सुंदर मेळ साधत अनाहत म्युझिक थेरपी संगीताच्या उपचार शक्तींच्या मदतीने आरोग्य आणि स्वास्थ्य यांचा प्रसार करण्याचे काम करते. संगीताच्या माध्यमातून आरोग्य आणि स्वास्थ्य यावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संतोष घाटपांडे यांनी याची स्थापना केली आहे. हे लोकांना सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी संगीत वापरण्यास मदत करते. अनाहत म्युझिक थेरपी शिकणाऱ्यांना संगीत थेरपिस्ट बनण्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण देखील देते. तरुण पिढीला याकडे आकर्षित करण्यासाठी संतोष यांनी त्यांचा व्यवसाय ऑनलाइन केला. इन्स्टामोजोच्या मदतीने, संतोष त्यांच्या सत्रांसाठी अधिक साइन-अप मिळवू शकले. इन्स्टामोजोच्या माध्यमातून अनाहतसाठी यशस्वी ऑनलाइन उद्योजकतेचा मार्ग सुकर झाला. ऑनलाइन थेरपी सत्रांसाठी नोंदणी करण्याकरिता एक लँडिंग पेज तयार करण्यासाठी इन्स्टामोजो स्मार्ट पेजचा वापर केला गेला आहे.

सोनिक टॉनिक म्हणून प्रसिद्ध असलेली अनाहत म्युझिक थेरपी ही संगीताची शक्ती वापरून मेंदूला सुसंवाद, शांतता आणि स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी चालना देत लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणते. ऑटिस्टिक मुलांच्या प्रतिसादात आणि गायन सुरु असताना रुग्णांच्या वर्तनात होत असलेले बदल त्यांनी पाहिले आहेत. मधुमेह, रक्तदाब, तणाव, नैराश्य आणि अगदी शारीरिक व्याधींसारख्या जीवनशैलीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या ४,५०० हून अधिक जणांच्या जीवनात त्यांनी बदल घडवून आणला आहे!

अनाहत म्युझिक थेरपीचे मालक संतोष घाटपांडे म्हणाले, “लोक म्युझिक थेरपीचा वापर करून काही आजारांवरील त्यांची औषधे हळूहळू कमी करू शकतात आणि नवीन जीवनशैली अंगीकारू शकतात. त्यामध्ये तणाव व्यवस्थापन आणि स्मरणशक्ती सुधारण्यासारख्या सामान्य गोष्टींपासून ते संधिवात, पचनसंस्थेसारख्या गुंतागुंतीच्या समस्यां तसेच अगदी केमोथेरपीच्या दुष्परिणामांपर्यंतच्या गोष्टींचा समावेश होतो. उपचारात्मक शक्तींसाठी संगीत वापरण्याबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याचे मार्ग मला शोधावे लागले. इन्स्टामोजोच्या मदतीने मी माझ्या क्लायंटना एक सहज ऑनलाइन अनुभव देऊ शकलो आणि या वैशिष्ट्यामुळे मला अधिकाधिक लीड्स मिळविण्यात मदत झाली. संगीत थेरपिस्ट म्हणून भारतातील १ लाख लोकांना प्रशिक्षित करण्याची तसेच संगीत थेरपिस्ट आणि सर्वसाधारण आरोग्य स्वास्थ्य टिकवून ठेवण्यात ते पार पाडू शकत असलेली मोलाची भूमिका याविषयी माझा दीर्घकालीन दृष्टीकोन आहे.”

इन्स्टामोजो डू-इट-युअरसेल्फ (डीआयवाय) ई-कॉमर्स ऑनलाइन स्टोअर उपलब्ध असलेल्या प्रत्येक ई-कॉमर्स वैशिष्ट्यासह जसे की अगदी घरातून पिकअप आणि डिलिव्हरीसह शिपिंगपासून, ईमेल आणि एसएमएस मोहिमेसारखी विपणन साधने, डोमेन, ईमेल आणि बरेच काही एकत्रित केले आहे. हे वापरण्यास सोपे आहे; विकासकाच्या मदतीची आवश्यकता लागत नाही आणि व्यवसायांच्या वाढीसाठी आणि दृश्यमानता मिळविण्यासाठी मोजो व्हर्सिटी नावाच्या विनामूल्य शिक्षण मंचासह परवडणाऱ्या किमतीत प्रगत ई-कॉमर्स सेवा प्रदान करते.

इन्स्टामोजोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक संपद स्वेन म्हणाले, “आमच्या व्यापाऱ्यांना इंस्टामोजोच्या सुविधांबद्दल माहिती आहे आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी या सेवांचा लाभ घेतला आहे हे पाहून आम्हाला आनंद होत आहे. हे सांगणे सोपे आहे, परंतु विना अडथळा अखंड ऑनलाइन व्यवसाय चालू राहण्यामध्ये खूप गोष्टी असतात. आमचे व्यापारी यशापर्यंत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो आणि त्यांना त्यांचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रेरित करतो. म्युझिक थेरपी सत्राची वैशिष्ट्ये ठळकपणे नमूद करण्यासाठी आणि अखंड नोंदणीसाठी आपल्या व्यवसायाकरता आमच्या स्मार्ट पेजचा प्रभावी वापर करून घेणे श्री. घाटपांडे यांना शक्य झाले. हे खरोखरच खूप उत्साहवर्धक आहे आणि छोटे व्यावसायिक डिजिटलदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या दिशेने प्रयत्न करत असताना लहान व्यवसाय मालकांच्या विकास प्रवासाला पाठिंबा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

इन्स्टामोजो अद्वितीय डू-इट-फॉर-मी सोल्यूशन्स सुविधा सादर करते. एखाद्या व्यवसायाला त्यांचे स्टोअर तयार करायचे नसल्यास किंवा डीआयवाय सेवांसाठी ते फारसे तयार नसल्यास इन्स्टामोजो तज्ञांची टीम ठरवलेल्या निवडक वैशिष्ट्यांसह स्टोअर तयार करते जे व्यवसायाच्या वाढीला आणि त्यांना पुढे जाण्यात मदत करेल. २०२० च्या सुरुवातीस कंपनीने गेट मी अ शॉप (GMAS), ही टाइम्स इंटरनेट समर्थित एक ई-कॉमर्स सक्षम फर्म प्राप्त केली आणि २०२० च्या उत्तरार्धात त्याचे प्री सीरीज सी राउंड ऑफ फंडिंग बंद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: