आता Vi अॅपवर ३८ हजार मराठी आणि हिंदी गाण्यांच्या लायब्ररीतून तुमची स्वतःची प्ले लिस्ट बनवा!
मुंबई : Vi अॅपवर महाराष्ट्र आणि गोव्यातील Vi वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त, अमर्यादित डाउनलोड, पॉडकास्ट, संगीत व्हिडिओचे ६ महिन्यांचे प्रीमियम सबस्क्रिप्शन Vi तर्फे सादर
· गाणी प्ले आणि डाउनलोड करणे, ट्रेंडिंग गाणी ऐकता येणे, प्लेलिस्ट, कलाकार तसेच रोमान्स, सुफियाना, हिपहॉप, अनप्लग्ड, वर्कआउट, मॉर्निंग योगा, भक्ती, मेहफिल, चिलॅक्स, मराठी पॉप, ९० चे संगीत, २००० चे सर्वोत्कृष्ट, टॉप १०० हिटमेकर्स अशा भिन्न शैलींमध्ये गाणी आणि बरेच काही…
महाराष्ट्र आणि गोव्यातील Vi ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन संगीत आस्वादासाठी एकापेक्षा जास्त म्युझिक अॅप्स डाउनलोड करण्याची आणि सबस्क्राईब करण्याची आता आवश्यकता नाही. आघाडीचा दूरसंचार ब्रँड Vi ने हंगामा म्युझिकच्या भागीदारीत दोन राज्यांतील ग्राहकांच्या पसंती आणि आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी विविध शैलींमधील ३८,००० मराठी आणि हिंदी गाणी सादर केली आहेत. याव्यतिरिक्त, Vi ने इंग्रजी आणि हिंदी यांच्यासह २० भारतीय भाषांमधील लाखो लोकप्रिय संगीत रचनांचा विस्तृत संग्रह तयार केला आहे. जाहिरातमुक्त संगीताची ही विशाल लायब्ररी सर्व Vi ग्राहकांसाठी पहिल्या ६ महिन्यांकरता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय केवळ Vi अॅपवर उपलब्ध आहे.
Vi अॅपद्वारे, Vi ग्राहकांना अमर्यादित डाउनलोड, संगीत व्हिडिओ, बॉलीवूडच्या ताज्या बातम्या मिळू शकतात. गाणी ऐकताना ते कॉलर ट्यून सेट करू शकतात आणि विविध प्रकारचे पॉडकास्ट देखील ऐकू शकतात. मराठी आणि हिंदी संगीत पर्यायांव्यतिरिक्त, Vi अॅपवरील हंगामा म्युझिक संगीत प्रेमींसाठी इतर १८ भाषांमधील गाणी देखील सादर करते.
व्होडाफोन आयडियाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे क्लस्टर बिझनेस हेड रोहित टंडन म्हणाले, “Vi सतत नाविन्यपूर्ण आणि विविध प्रकारच्या गोष्टी सादर करत ग्राहकांना पुढे राहण्यास मदत करून आमच्या ग्राहकांचे जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. Vi म्युझिकच्या माध्यमातून आम्ही आता महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशातील आमच्या ग्राहकांना संगीतमय मनोरंजनाचा दैनंदिन आस्वाद घेता यावा यासाठी सुसंगत आणि स्थानिक संगीत आशयही आणत आहोत. अखंड ४ जी कनेक्टिव्हिटी आणि वेगवान स्पीड यांसह Vi हंगामा म्युझिकसोबतच्या आपल्या भागीदारीतून महाराष्ट्र आणि गोव्यातील आमच्या सर्व ग्राहकांना Vi अॅपमध्ये सामील होण्यासाठी आणि इंग्रजी, हिंदी आणि मराठीच्या मोठ्या सांगीतिक लायब्ररीमध्ये विनामूल्य प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”
Vi अॅपवरील हंगामा म्युझिक सादरीकरणाचा उद्देश ग्राहकांच्या सर्वसमावेशक संगीत प्रवाह सेवेची गरज पूर्ण करणे हा आहे. हिंदी आणि मराठी गाण्यांव्यतिरिक्त Vi ग्राहकांना आसामी, बंगाली, भोजपुरी, गुजराती, हरियाणवी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, उडिया, राजस्थानी, तमिळ, तेलुगू या भारतीय भाषांमध्ये तसेच कोरियन, अरबी, सिंहली आणि स्पॅनिश संगीताचा पर्याय आहे.