Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

मी ‘राजमार्गा’वर होतो आणि ‘राजमार्गा’वरच राहीन -वसंत मोरे


पुणे:मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यासंदर्भातील भूमिकेशी फारकत घेतल्यामुळे चर्चेत आलेले मनसेचे नेते वसंत मोरे अखेर पुण्यात परतले आहेत. मनसेचे राज्यव्यापी आंदोलन सुरु असताना वसंत मोरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी पुण्यात परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मी ‘राजमार्गा’वर होतो आणि ‘राजमार्गा’वरच राहीन.असे वसंत मोरे म्हणाले आहेत.
माझ्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसचाही प्रसारमाध्यांनी विपरीत अर्थ काढला. स्वामी विवेकानंदांचं आवडणारे वाक्य मी स्टेटसला ठेवले होते. मात्र, ‘माझा रस्ता चुकतोय’ ही शेवटची ओळच फक्त प्रसारमाध्यमांनी ध्यानात घेतली, असे वसंत मोरे म्हणाले.
दरवर्षी तिरुपती बालाजीला जातो. माझा हा कार्यक्रम नियोजित होता. ठाण्याच्या सभेपूर्वीही राज ठाकरे यांनी मला भेटायला बोलावले होते. त्यावेळीही माझ्या घरात लग्नकार्य होते. मात्र, राज ठाकरे यांनी मला उद्याच्या सभेला ये, असे सांगितले. त्यामुळे मी घरचा कार्यक्रम सोडून ठाण्याच्या सभेला गेलो. मी त्या सभेला गेलो नसतो तर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता. राज ठाकरे यांच्या पुण्यातील दौऱ्यावेळीही मी हजर होतो. मी राज ठाकरे यांच्या घरी उशीरा गेलो. त्यामुळे मला वढू येथे जाऊन त्यांची भेट घ्यावी लागली. एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला तरी काही अडत नाही. पुणे दौऱ्यात राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे इतर कार्यकर्ते आणि शहराध्यक्ष होते, असेही वसंत मोरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार माझ्या प्रभागातील मशिदींवरील भोंगे वाजले नाहीत.माझ्या प्रभागात एकूण ६ मशिदी आहेत. पण येथील मुस्लीम बांधवांनी अजानचा आवाज पहिल्यापासून बंद केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन झाल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading