रविवारपासून रंगणार राज्य बॉक्सिंग स्पर्धा

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा : २६२ खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग

पुणे  : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने पुणे शहर बॉक्सिंग संघटना व गोल्ड बॉक्सिंग अकादमी यांच्या वतीने महाराष्ट्र दिन तसेच कै. गोविंदराव बाबुराव नाईक यांच्या स्मरणार्थ सब ज्युनियर गटाची १० वी मुलींची व ८ वी मुलांची राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा रविवार १ मे ते ४ मे दरम्यान बाबुराव सणस मैदानावर घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजक तुषार नाईक व अनिल परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २६२ खेळाडू सहभागी होणार असून यामध्ये १७२ पुरुष व ९३ महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे. हे खेळाडू २९ जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन १ मे रोजी सकाळी ११ वाजता बाजाज हाउसिंग फायनान्सचे सीसीओ गौरवकुमार पृथी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बॉक्सिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: