राज ठाकरेंच्या ताफ्याला दुसऱ्यांदा अपघात; साईनाथ बाबर यांच्या गाडीला जोरदार धडक
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना दुसऱ्यांदा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पहिला अपघात नगर जिल्ह्यात घोडेगावजवळ झाला. तर आता दुसरा अपघात हा औरंगाबादजवळ झाला आहे. दुसरा अपघात हा मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीला झाला आहे. त्यात सुमारे दहाहून अधिक गाड्यांचे नुकसान झाले आहे.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी आज पुण्यातून शंभर गाड्यांच्या ताफ्यासह ते औरंगाबादला रवाना झाले आहेत. मात्र, त्या सभेला पोचण्यापूर्वीच त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना दोनदा अपघात झाला आहे.