Tuesday, August 11, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

वसंत मोरे म्हणतायेत ‘मी येतोय… ‘

पुणे : औरंगाबाद इथल्या बहुचर्चित सभेसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादला गेले. त्याआधी दोन दिवस राज ठाकरे पुण्यात होते. मात्र या संपूर्ण दौऱ्यात मनसेचे माजी शहर प्रमुख  वसंत मोरे कोठेही दिसले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.   

यामध्ये वसंत मोरे यांनी लिहिले आहे की, “मी एकदम ठणठणीत आहे. माझी काळजी करणाऱ्यांनी स्वतःची काळजी करावी. मी उद्या सांभाजीनगरला येतोय” असे त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले आहे.   

https://fb.watch/cJ0iikxTie/ 

दरम्यान, कालही वसंत मोर राज्य ठाकरे यांच्या सोबत नव्हते. त्याविषयी सुद्धा वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यावेळी मोरे हे एका इफ्तार पार्टीला उपस्थित होते. त्यांनी तेथील फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, “माझी छोटी बहीण आणि जनता वसाहत मधील नागरिकांची कोरोना काळात सेवा करत असताना कोरोना होऊन तरुणपणात दगावलेलेले संपूर्ण जनता वसाहातचे कै. हमिदसर यांची पत्नी आणी पर्वती विधानसभा मतदार संघाची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची उपविभाग अध्यक्ष नाज हमीद इनामदारही जरा एकटी पडली होती. पोरगी खुप छान काम करते, म्हणून तिच्या एरियात इफ्तार साठी गेलो होतो.
खूप खूश झाली, पोरगी गरीब आहे पण स्वत: शिक्षिका संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे नाज ” भविष्यात या भागाची लोकप्रतिनिधी नक्की होऊ शकेल”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading