अविनाश भोसले यांच्याशी संबंधित ठिकाणांवर CBI कडून छापे

मुंबई :. मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने (CBI) छापेमारीस सुरूवात केली आहे. नामांकीत बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली आहे मागील अनेक दिवसांपासून अविनाश भोसले हे ईडीच्या (ED) रडारवरही आहेत.

अविनाश भोसले यांचा मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, ते हॉटेल व्यावसायिक आहेत. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय देखील आहे. मागील वर्षी ईडीकडून कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची सुमारे 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. दरम्यान, सध्या सीबीआयने अविनाश भोसले यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली असल्याची माहिती पसरली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: