राज ठाकरे उद्या तब्बल २०० पुरोहितां समवेत महापूजा करणार

पुणे : भोंग्यावरून सरकारला इशारा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले आहेत. १ मे ला जाहीर केलेल्या औरंगाबादमधील सभेसाठी शनिवारीच ते पुण्यातून निघणार आहेत. दरम्यान पुण्यातील मुक्कामात ते औरंगाबादमधील जाहीर सभा, ३ मे च्या महाआरतीचे नियोजन व ५ जूनचा अयोध्येचा दौरा याबाबत मनसेतील नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी पुण्यात थांबले आहेत. औरंगाबादला मार्गस्थ होण्याअगोदर पुण्यात १०० ते २०० गुरुजी आणि पुरोहित यांच्या उपस्थितीत महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर दिली आहे.

आज राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. सभा, महाआरती, त्यानंतर अयोध्या या सर्वांबाबत पुण्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. उद्या सकाळी ८ वाजता पुण्यात महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पूजा होणार आहे. त्यांना पुढील कार्यासाठी यश मिळो असा शुभशीर्वाद गुरुजी देणार असल्याचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यानंतर वढू येथे ते जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी जवळ जाऊन आशीर्वाद घेतील. त्यानंतर औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे मार्गस्थ होतील अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: