शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त १ मे पासून प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाचने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामांवर आधारित सचित्र विभागीय प्रदर्शनाचे १ ते ५ मे या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती व जनसंपर्क विभागामार्फत आयोजन करण्यात येणार आहे. 

प्रदर्शनात सचित्र मजकूराच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये कृषी, महसूल, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, उर्जा, अन्न व पुरवठा, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, आदिवासी, जलसंधारण, शिक्षण, क्रीडा, उद्योग, मराठी भाषा, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन, गृहनिर्माण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, नगरविकास आदी विभागांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

त्याचबरोबच पुणे विभागात ५ जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, वैद्यकीय सुविधा, पयर्टन, तीर्थक्षेत्र विकास यांसह विविध विकास योजनांची व कामाची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: