शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा ‘मेरे देस की धरती’

कार्निव्हल मोशन पिक्चर्स, डॉ. श्रीकांत भासी यांच्या नेतृत्वाखालील कार्निव्हल ग्रुपमधील एक अग्रगण्य प्रोडक्शन स्टुडिओने अलीकडेच बहुप्रतिक्षित ‘मेरे देश की धरती’ ची घोषणा केली. आता, मिर्झापूर फेम दिव्येंदू स्टारर या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे आणि अगदी कमी वेळेत या ट्रेलर ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

शेतकऱ्यांच्या समस्यांवर अतिशय समर्पक असे भाष्य करणारा हा चित्रपट विनोद व मनोरंजन देखील घेऊन येत आहे. मिर्झापूर फेम दिव्येंदु शर्मा,  अनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात प्रमुख भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ फाझल यांनी केले आहे तसेच वैशाली सरवणकर या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. हा चित्रपट बनावत असताना शेतकऱ्यांचे कार्य व समस्य पूर्णपणे जाणून घेऊन तसेच त्याचा अभ्यास करून चित्रपट बनवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या व त्यावर काय समाधान असावे हे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मेरे देस कि धरती हा चित्रपट कॉमेडी व भावनात्मक गांभीर्य यांचा सुरेख मेळ असल्याचे सांगितले जात आहे आणि त्यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातल्या लोकांना पसंतीस उतरेल असा विशेष निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: