महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या संघर्षाला दुसऱ्यांदा यश!

मुंबई : १३ मार्च २०२२ पासुन गेल्या ४७ दिवसांपासून महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती – जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी असलेल्या महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) या संस्थेच्या प्रश्नां संदर्भात बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.

आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी महाज्योती संस्थेस लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा या प्रमुख मागणी विषयी OBC च्या विषयावर स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीने सकारात्मकता दर्शवली आहे. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन उपसमिती मध्ये जितेंद्र आव्हाड,  विजय वडेट्टीवार, गुलाबराव पाटील व संजय राठोड यांचा समावेश आहे.

या मंत्रिमंडळ उपसमितीने महाज्योती संस्थेस अतिरिक्त १५० कोटी निधी देण्याची केलेली शिफारस मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत स्वीकारण्यात आली आहे.

महाज्योती संस्थेस अर्थसंकल्पामध्ये २५० कोटीचा निधी मिळाला होता. येणाऱ्या काळात अजून १५० कोटी मिळणार.

महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री बच्चू कडू, मंत्री दत्तामामा भरणे, प्रधान वित्त सचिव राजगोपाल देवरा, अप्पर मुख्य सचिव नंदकुमार आणि विरोधी पक्षातील विनोद तावडे, संजय कुटे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, गोपिचंद पडळकर, राम सातपुते या सर्वांना व इतर ६० ते ७० आमदार – खासदार व मंत्री या सर्वांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन महाज्योती संस्थेच्या प्रश्नांसंदर्भात नितीन आंधळे यांनी चर्चा केली होती.

प्रस्थापित समाजाला ताटात आणि भटके-विमुक्त, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना ओंजळीत वाढायचे धोरण हे महाविकास आघाडी सरकार राबवत आहे. OBC मंत्री विजय वडेट्टीवार व महाज्योती चे संचालक मंडळ इतर समाजाच्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांना दुय्यम व सापत्न वागणूक देण्याचे धोरण राबवत असल्याची टीका महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन आंधळे यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: