‘लगन’ ६ मे ला चित्रपटगृहात

प्रेम… एक छोटासा शब्द. पण किती महत्त्व आहे या शब्दाला! प्रेम जगातली सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच.! प्रेम हे प्रेम असतं ते कोणी आणि कोणावर केलं यावर ते चूक की बरोबर हे नाही ठरवता येतं.! प्रेमाच्या सुखद परीस्पर्शाची जाणीव करून देत ते निभावण्याच्या सामर्थ्याची गोष्ट सांगणारा अर्जुन यशवंतराव गुजर दिग्दर्शित लगन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जी.बी. एंटरटेंन्मेंट निर्मित हा चित्रपट ६ मे चित्रपटगृहांत दाखल होत आहे.

प्रेमासाठी गरज असते ती दोन प्रेमळ मनांची. ही मने जुळली की मग प्रेमासाठी काहीही करण्याचं बळ आपोआप मिळतं. याच सामर्थ्याची आणि निरपेक्ष, तरल प्रेमाचा अनुभव देणाऱ्या लगन चित्रपटातून अज्या आणि नांदिनीची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सुजित चैारे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या जोडीसोबत स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे,अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

प्रेम आणि नात्यातील भावभावनांचा प्रवास दाखवताना ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रेमाला प्रेमानेच जिंकता येऊ शकतं हा विचार घेऊन हा चित्रपट केल्याचे दिग्दर्शक अर्जुन गुजर सांगतात. ही फ्रेश जोडी आणि चित्रपटाचं संगीत प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास ही ते व्यक्त करतात
चित्रपटाला साजेशी दणक दणक, सरलं, पायी फुफाटी, दचकतंय ही चारही गाणी चांगली जमून आली असून सध्या ती गाजतायेत. अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे आहे.

‘लगन’चे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलं आहे. भारत गुजर, बिभीषण गुजर ,कैलास गुजर, किशोर काकडे, सय्यद मुस्तफा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: