राज्यात आज व उद्या पुन्हा पाऊस; त्यानंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणे : राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हिमालयाच्या पायथ्याशी झालेल्या हवामान बदलामुळे राज्यात पुढील 2 दिवस पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

दोन दिवस पाऊस  झाल्यानंतर पुढील पाच दिवस 29 एप्रिल ते 2 मेपर्यंत उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागात 27 आणि 28 एप्रिलला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या 24 तासांत कोकणात जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भात कोरडे हवामान आहे. तर जळगाव, नाशिक, नगर या भागांत उष्णतेची लाट अधिक तीव्र राहणार आहे. आगामी पाच दिवसांत 29 एप्रिल ते 2 मेदरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार आहे असंही हवामान विभागाने म्हटले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: