Good News : 5-12 वयोगटातील मुलांच्या लासिकरणासाठी Corbevax व Covaxin ला मान्यता

DCGI 5-12 वयोगटातील लोकांसाठी Corbevax ला, 6-12 वयोगटासाठी Covaxin, 12 वर्षांपेक्षा जास्त वयोगटासाठी ZycovD ला आपत्कालीन वापरासाठी मंजूर

दिल्ली : ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या COVAXIN ला प्रतिबंधित आणीबाणीच्या वापराची परवानगी दिली आहे, एएनआय वृत्तसंस्थेने याबाबद ट्वीट करून माहिती दिली आहे.

DCGI ने 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ZycovD (Zydus Cadila लस) आणि 5-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Corbevax ला आपत्कालीन वापर अधिकृतता देखील मंजूर केली आहे. दरम्यान, याबाबत केंद्र सरकार कडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.

यासह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे कारण शाळा आधीच सुरू झाल्या आहेत आणि सध्या, 12 वर्षाखालील मुलांना लसीकरण करणे बाकी आहे. देशातील विशेषत: मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचा अहवाल आणि कोविडची वाढती प्रकरणे चिंतेचे कारण आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: