fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

महागाईविरुद्ध काँग्रेस दुसर्‍यादिवशी आक्रमक

पुणे : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला सोसाव्या लागणाऱ्या महागाईविरोधात आज अप्पर इंदिरा नगर बिबवेवाडी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली महागाई जुमला आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी मार्केट यार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मोदी सरकारने वाढवलील्या महागाईचा काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाच्यावेळी अभय छाजेड म्हणाले, या मोदी सरकारने कोरोना कमी झाला तरी महागाई कमी केली नाही. सामान्य जनता महागाई वाढल्यामुळे हतबल आहे. पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तरी मोदी सरकार महागाई कमी करत नाही आम्ही त्याचा निषेध करत आहोत.
जोपर्यंत मोदी सरकार महागाई कमी करत नाही तोपर्यंत आम्ही जुमला आंदोलन चालूच ठेवणार
आहोत. असे अभय छाजेड म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading