Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

मधुमेह तज्ज्ञ डॉ. शैलजा काळे यांची आरएसएसडीआय महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी निवड

पुणे : शहरातील प्रख्यात मधुमेह्तज्ज्ञ डॉ. शैलजा काळे यांची रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया’च्या (आरएसएसडीआय) महाराष्ट्र चॅप्टरच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२३ पर्यंत असेल. आरएसएसडीआय ही मधुमेह या विषयावर काम करणार्या वैद्यकीय तज्ज्ञांची सर्वात मोठी संघटना असून, डॉ. काळे या गेल्या २५ वर्षांपासून या संघटनेच्या सदस्या आहेत. त्यांनी यापूर्वी संघटनेच्या कार्यकारी समितीच्या सदस्य आणि सह-सचिव म्हणून काम पाहिले आहे.

आगामी वर्षासाठी संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये डॉ. विजय पणीकर (मुंबई), डॉ. एच.बी.चंदालिया (मुंबई), डॉ.संजीव इंदूरकर (औरंगाबाद), नियोजित अध्यक्ष – डॉ. नारायण देवगावकर (नाशिक), माजी अध्यक्ष – डॉ. शशांक जोशी (मुंबई), सचिव – डॉ. राजीव कोविल (मुंबई) यांचीदेखील विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.

आगामी वर्षासाठीच्या नियोजनाबाबत माहिती देताना डॉ. काळे म्हणाल्या,” संघटनेच्या अध्यक्ष पदावर काम करताना, महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मधुमेहविषयक जागृतीवर जास्त भर देणार आहे. यासाठी प्रादेशिक स्तरावर चार ते पाच बैठकांचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील इतरही मधुमेहतज्ज्ञ डॉक्टरांना सहभागी करून घेतले जाईल. नागरिकांना मधुमेह या विषयाचे ज्ञान देण्यासाठी आम्ही नुकतेच ‘महाआरएसएसडीआय २०२२ पुणे’ हे युट्युब चॅनेल सुरू केले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही सार्वजनिक कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading