‘लाल इश्‍क – फॉरेन स्‍पेशल’मध्‍ये पहा २८ एप्रिलपासून ‘अचियारा के अनोखे रहस्‍य’


एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘लाल इश्‍क – फॉरेन स्‍पेशल’मध्‍ये पुढे पहा लोकप्रिय साऊथ कोरियन टेलिव्हिजन सिरीज ‘दि व्हिलेज अचियाराज सिक्रेट’चे हिंदी रूपांतरण कोरियन रहस्‍यमय थ्रिलर ‘अचियारा के अनोखे रहस्‍य’ २८ एप्रिलपासून दर सोमवार ते रविवार सायंकाळी ५ वाजता. या शोमध्‍ये एमिलीच्‍या भूमिकेत मून गेन-यंग, विलच्‍या भूमिकेत यूक सँग-जे, रिबिकाच्‍या भूमिकेत जँग-हि-जिन आणि लिलीच्‍या भूमिकेत शिन यून-क्‍यांग हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

अचियारा गुन्‍ह्याचे कमी प्रमाण असलेले अत्‍यंत शांत स्‍थळ म्‍हणून ओळखले जाते. कुटुंबामधील सर्वांना गमावलेली एमिली (मून गेन-यँग) तिच्‍या आजीकडून रहस्‍यमय पत्र मिळाल्‍यानंतर इंग्रजी विषयाची शिक्षिका म्हणून तिचे प्रोफेशन सुरू करण्‍यासाठी अचियाराला जाते. तिला गुप्‍त रहस्‍य आणि सामना कराव्‍या लागणा-या नाट्यमय उलगड्यांच्‍या सीक्‍वेन्‍सबाबत माहित नसते. पहिल्‍याच दिवशी तिला एक पुरलेला मृतदेह सापडतो, ज्‍यामुळे संपूर्ण गावामध्‍ये हाहाकार निर्माण होतो. सर्वजण मृतदेहाची ओळख, तिचा मृत्‍यू का व कसा झाला याबाबत अंदाज करू लागतात. आर्ट स्‍कूलमधील चित्रकला शिक्षिका व सर्वात शक्तिशाली पुरूषाची पत्‍नी रिबिका (जँग-हि-जिन) हरवलेली असते आणि शेवटी तो मृतदेह तिचाच असल्‍याचे निष्‍पन्‍न होते. अचियाराच्‍या शक्तिशाली पुरूषाची पत्नी लिलीवर (शिन यून-क्‍यांग) गुन्‍हेगार असल्‍याचा संशय असतो. पण तरूण व उत्‍साही पोलिस अधिकारी विल (यूक सँग-जे) तपास सुरू करतो, तो हत्‍येच्‍या मालिकेचा उलगडा करतो, ज्‍यामधून रहस्‍य व दुर्दैवी ट्विस्‍ट्स समोर येतात आणि अधिक व्‍यक्‍तींचा त्‍यामध्‍ये समावेश असल्‍याचे दिसून येते. या प्रकरणामध्‍ये डोळ्यांना दिसणा-या बाबींपेक्षा बरेच काही दडलेले आहे.
अचियाराच्‍या रहस्‍याचा उलगडा पहा ‘लाल इश्‍क – फॉरेन स्‍पेशल’मधील ‘अचियारा के अनोखे रहस्‍य’मध्‍ये २८ एप्रिलपासून दर सोमवार ते रविवार सायंकाळी ८ वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a Reply

%d bloggers like this: