राजकुमार राव व जिवासह रॅपिडोची आयपीएल मोहीम

मुंबई : रॅपिडो हे भारतातील सर्वात मोठे बाइक-टॅक्सी व्यासपीठ १९ एप्रिल २०२२ पासून राज कुमार राव व जिवा असलेली आयपीएल मोहिम ‘एकदमआराम से’च्या लाँचसह आपली उपस्थिती वाढवत आहे. सिता-यांनी भरलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला मिळालेल्या भव्य यशानंतर दुसरा टप्पा शहरातील प्रवाशांमध्ये रॅपिडोच्या सेवांबाबत जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. या सेवा कमी खर्चिक, जलद व आरामदायी आहेत. या जाहिरातीचा दैनंदिन प्रवासामध्ये सुधारणा आणण्याचा आणि भारतामध्ये रॅपिडोच्या ब्रॅण्डबाबत जागरूकता वाढवण्याचा मनसुबा आहे.

नवीन जाहिराती प्रत्येक जाहिरातीला राज कुमार रावसह हिंदी स्पीकिंग मार्केटसाठी हिंदीमध्ये आणि जिवासह नॉन-हिंदी स्पीकिंग मार्केटसाठी तमिळ व तेलुगुमध्ये दाखवते. या मनोरंजनपूर्ण व सर्वसमावेशक जाहिरातींचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले असून मॅजिक्स एंगेज व ड्रिम वॉल्ट मीडिया हाऊसची निर्मिती आहे आणि एनॉर्मोस ब्रॅण्ड्स क्रिएटिव्ह एजन्सी आहे. मेट्रो, प्रथम व द्वितीय श्रेणीच्या शहरांमधील प्रेक्षकांसाठी इंटीग्रेटेड मार्केटिंग कॅम्पेन टीव्ही, डिजिटल, ओओएच अशा चॅनेल्सवर रीलीज करण्यात येईल.

रॅपिडोचे विपणन प्रमुख अमित वर्मा म्हणाले, “नवीन जाहिराती रॅपिडोला भारतातील प्रवासाचे पर्यायी साधन म्हणून स्थापित करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. रॅपिडोची सेवा कमी खर्चिक, जलद व प्रवासाचे आरामदायी साधन आहे. आम्‍हाला आमच्या पहिल्या मोहिमेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आम्ही पुढील टप्पा लाँच केला आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांमधील दोन अत्यंत लोकप्रिय सितारे राज कुमार राव व जिवा आहेत. आम्ही आयपीएलदरम्यान अधिक टप्पे लाँच करत ही गती कायम ठेवू. यंदाच्या सीझनमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला असल्याने स्पर्धा अधिक तगडी होण्याची अपेक्षा आहे आणि म्हणूनच नेहमीपेक्षा अधिक दर्शकत्व साध्य होईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: