वीजप्रश्नावरून पुण्यात मनसे आक्रमक
पुणे : वीजप्रश्नावरून पुण्यात मनसे आक्रमक झाली आहे. आज मनसेने महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे. भारनियमन आणि सिक्युरिटी डिपॉझिटचा मनसेने यावेळी विरोध केला आहे.
राज्यात सुरू झालेले भारनियमन हे राज्य सरकारचे अपयश आहे. वीजटंचाईचा प्रश्न लवकर सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी मनसेचे कार्यकते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोषणाबाजी करत महावितरणच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले .
साईनाथ बाबर म्हणाले,राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात वीजेची टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा असल्याने वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यात भारनियमन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यावर राज्य सरकारने त्वरीत तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही करत आहोत.असे साईनाथ बाबर म्हणाले.