‘राणा – राणावत’ना पुढे करून, भाजप चे बायकी राजकारण… काँग्रेस राज्य प्रवक्ते – गोपाळदादा तिवारी


पुणे : ‘मॅाडेलींग अभिनेत्र्या’ कंगना राणावत व नवनित राणा यांनाच् काही कारणाने पुढे करून मुख्यमंत्री ऊध्दव  ठाकरे व ‘मविआ सरकार’ला अस्थिर करण्याचे भाजप नेत्यांचे पोरकट व ऊथळ बायकी राजकारण निंदनीय असल्याचे सांगून काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी निषेध केला..
फडणवीसांच्या ‘पत्रकार परीषदे’मुळे अखेर हनुमान चालीसा’चे छुपे प्रवर्तक भाजप असल्याचेच सिध्द झाले.. तथाकथित ‘भोंगे व हनूमान चालीसाचेच’ राजकारण करायचे होते तर भाजपने स्वतः पुढे येऊन सुरवातीसच का केले नाही..?
श्री हनुमान चालीसा’चा मतिथार्त समजून न घेता, तथाकथित हिंदूत्वाच्या राजकारणाची चुल पेटवणाऱे सामाजात फक्त दुही माजवण्याचाच प्रयत्न करत नाहीत तर ‘प्रभू हनुमान चालीसाचे’ महत्व, पावित्र्य व गांभीर्य देखील कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
महीलांना पुढे करून हनुमान चालीसा रस्त्यावर म्हणायला लावण्याचा इव्हेंट हा ‘ताटे व थाळ्या वाजवण्याजोगा’ आहे काय..(?) असा संतप्त सवाल विचारून काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी हा प्रकार ‘आपल्या सहीत असंख्य हनुमान भक्तांना’ वेदनादायक असल्याचे देखील सांगितले.. या ऐवजी जनतेस भेडसावणाऱ्या वाढत्या महागाई व बेरोजगारी विषयी आंदोलन पेटवले असते व प्रभू श्री हनुमान मंदीरांमध्ये साकडे घालत जर श्री हनुमान चालीसा म्हंटला असता तर ती समजू शकलो असतो व हनुमान चालीसा म्हणण्याची ती योग्य व पवित्र पध्दत ठरली असती.. असे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले..
‘राज्याला कर्जबाजारी’ करून सत्ता बनवू शकत नसल्याचे राज्यपालांना लेखी कळवून, पळ काढणाऱ्यांची आता मात्र सत्ते शिवाय चडफड होत असुन फडणवीसादी मंडळींचे भ्रष्टाचाराचे पुरावे हाती लागू नयेत म्हणून देखील मविआ सरकार अस्थिर करण्याचे कुटील कारस्थान व थयथयाट चालला आहे.. अशी पुस्ती ही गोपाळदादा तिवारी यांनी पुढे जोडली..!..,

Leave a Reply

%d bloggers like this: