वसुंधरा दिनानिमित्त गोदरेज समुहातर्फे विशेष पुस्तकाचे प्रकाशन

गोदरेज समुहाने मुलांसाठीच्या द लास्ट क्लाउड, रे, ड्रॉप, मॅन्ग्रोव्ह अँड बी या पुस्तकाचे प्रकाशन यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त केले. मुलांनी, इतर व्यक्तींनी आणि व्यावसायिक प्रमुखांनी पर्यावरणाचे रक्षण आणि मौल्यवान प्रजातींचे नष्ट होण्यापासून संरक्षण यासाठी आपली संसाधने गुंतवावीत, असे आवाहन या पुस्तकाच्या निमित्ताने करण्यात आले आहे.

‘माही’ या व्यक्तिरेखेद्वारे हे पुस्तक मुलांच्या कथांद्वारे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पर्यावरण जागृती आणि त्याच्या संरक्षणाची गरज निर्माण करण्याचा संदेश देते. आपले पर्यावरण वाचवण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यासंबंधीच्या प्रयत्नांमध्ये तरुण पिढ्यांना सहभागी करून घेण्याची अत्यावश्यकता या पुस्तकातून दाखविण्यात आली आहे.

घातक पदार्थांचा वापर कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि त्यांचे पुनरुज्जीवन करणे यांसारख्या चांगल्या सवयी लहान वयातच लागणे किती महत्त्वाचे आहे, याचे चित्रण करून पर्यावरणाविषयी चिंता सर्व पातळ्यांवर वाढवणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. मुले पर्यावरणीय समस्यांना अधिक चांगला प्रतिसाद देतात, असे निरीक्षण यात मांडण्यात आले आहे.

या पुस्तकाविषयी भाष्य करताना गोदरेज समुहाच्या कार्यकारी संचालिका व मुख्य ब्रँड ऑफिसर तान्या दुबाश म्हणाल्या, “गोदरेज समूह हा ऐतिहासिकदृष्ट्या पर्यावरण संवर्धनात आघाडीवर आहे आणि आमच्या छत्राखालील प्रत्येक संस्था स्वच्छ, हरीत व चांगले जग निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याकरीता कटिबद्ध आहे. आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्या भूतलासाठी आपली जबाबदारी म्हणून आम्ही नेहमीच शाश्वत कामांचा विचार केला आहे. आगामी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, ‘द लास्ट क्लाउड, रे, ड्रॉप, मॅन्ग्रोव्ह अँड बी’ या पुस्तकाद्वारे सर्वांच्या वैयक्तिक जबाबदारीला प्रोत्साहन देण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही आशा करतो की या पुस्तकाच्या प्रत्येक वाचकामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि संवर्धनासाठी स्वतःला गुंतवण्याची उत्कटता निर्माण होईल.”

आम्ही हे पुस्तक तीन भागांमध्ये सादर करणार आहोत, आणि त्याद्वारे संपूर्ण आठवडाभर वसुंधरा दिन साजरा करणार आहोत.

‘क्रिएटिव्हलँड एशिया’चे मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर अनू जोसेफ म्हणाले, “प्रत्येक वसुंधरादिनी आम्ही जगभरातील प्रौढांना भविष्यातील मुलांबद्दल विचार करण्यास सांगत असतो. आम्ही विचार केला की यावेळी तरी आपण ही जबाबदारी लहान मुलांकडे देऊ या. शेवटी, आपल्या भूतलाचे भविष्य त्यांच्याशीच गुंफलेले आहे. आणि लहान मुलांना पृथ्वीच्या इतिहासाबद्दल चांगली माहिती झाली, तर ते मोठे झाल्यावर ग्लोबल वार्मिंगची परिस्थिती बदलू शकतील. ‘द लास्ट क्लाउड, रे, ड्रॉप, मॅन्ग्रोव्ह अँड बी’ या व्हिडिओबुकच्या माध्यमातून माही ही लहान मुलगी व तिचे मित्र हे पर्यावरणाच्या जपणुकीचा उपदेश करतील आणि त्यातून भूतलाविषयीची सकारात्मकता व जग #EarthfullyYours व्हावे यासाठीचे बदल यांचा प्रसार करतील.”

Leave a Reply

%d bloggers like this: