रोल बॉल मैदान उभारणीसाठी आमदार निधीतून २५ लाख निधी – चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे : पुण्यात जन्मलेला रोल बॉलसारखा क्रीडा प्रकार जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही देऊन रोल बॉलचे मैदान उभारणीसाठी आमदार निधीतून २५ लाखाचा निधी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथे पुणे जिल्हा रोलबॉल असोसिएशनच्या वतीने मैदान विकसीत करण्यात येत असून, याच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रोलबॉल संघटनेचे संस्थापक सदस्य वसंत राठी, महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे उपाध्यक्ष तथा भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक अमोल बालवडकर, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, पुणे जिल्हा रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे, सचिव प्रमोद काळे, बाबासाहेब भांड, विजय काकडे, जय काकडे,यांच्या सह इतर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजू दाभाडे यांच्या सारख्या क्रीडा प्रशिक्षकाने सुरु केलेला हा क्रीडाप्रकार जागतिक पातळीवर जाणे गरजेचेच आहे. आज 57 देशांमध्ये खेळला जाणारा रोल बॉलसारख्या क्रीडा प्रकाराचा पुण्यात जन्म झाला. पण अनेकांना त्याची माहिती नाही. त्यामुळे हा क्रीडा प्रकार सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून, त्याच्या मैदान उभारणीसाठी आमदार निधीतून २५ लाख निधी उपलब्ध करून देत आहे. भविष्यात ही लोकसहभागातून आणि कंपन्यांच्या सीएसआर फंडचा वापर करुन, हा क्रीडा प्रकार जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार.

ते पुढे म्हणाले की, रोलबॉलच्या प्रसिद्धीसाठी पुणे जिल्हा रोलबॉल असोसिएशननेही पुढाकार घेऊन, जिल्हा किंवा राज्यस्तरिय स्पर्धेचे आयोजन करावे, या स्पर्धेसाठी आवश्यक ती सर्व मदत करु, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

रोल बॉलसाठी मैदान उपलब्ध व्हावे यासाठी स्मार्ट सिटी चे संचालक नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि गजानन थरकुडे यांनी केलेल्या प्रयत्नांचा रोल बॉल संघटनेचे सचिव प्रमोद काळे यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष गजानन थरकुडे यांनी आ. पाटील यांचे आभार मानले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: