fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

आमदार चषक : आदित्य, प्रदीप, आश्विनी, समिक्षा यांना सुवर्ण

राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा : शांभवी कदम, दिव्या करडेल यांना जेतेपद

पुणे: महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्यावतीने आयोजित आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो स्पर्धेत आदित्य धोपावकर, प्रदीप गायकवाड, आश्विनी सोलंके, समिक्षा शेलार यांनी आपआपल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक या स्पर्धेच्या संयोजिका आहेत. टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत ८१ किलो खालील वजन गटात अहमदनगरच्या आदित्य धोपावकरने पुणे जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या बालाजी एस. याचा मोरोत्तो सिओईनागे या डावाचा वापर करत पूर्ण गुण संपादन करून पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतींमध्ये अंशराज जैस्वाल व विनायक तांबे यांनी अनुक्रमे लुकमान तायब व अभिषेक सकुंडेचा पराभव करून कास्यपदक पटकाविले.

मुलांच्या १०० किलो खालील वजन गटात कोल्हापूरच्या आदित्य पाटीलने ठाण्याच्या हितेन बुटोलाचा पराभव करून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या गटात उस्मानाबादच्या प्रसाद निंबाळकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान सकाळच्या सत्रात आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते मुलांच्या गटाची लढत सुरू करून स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या संयोजिका आमदार मुक्ता टिळक उपस्थित होत्या. यावेळी महाराष्टÑ ज्यूदो असोसिएशनच्यावतीने खास तयार करण्यात आलेले मानपत्राचे वाचन तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे यांनी केल्यानंतर आमदार मुक्ता टिळक यांना अ‍ॅड धनंजय भोसले व शैलेश टिळक यांनी ते प्रदान केले. कार्यक्रमास भाजपाचे श्रीपाद ढेकणे, धीरज घाटे, दत्ता खाडे, कुणाल टिळक यासह माजी आॅलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते कावस बिलिमोरीया, ज्यूदो महासंघाचे माजी सचिव मुश्ताक अली, महाराष्टÑ ज्यूदो असोसिएशनचे उपाध्यक्ष राजकुमार पुनकर, यतीश बंगेरा, रवी पाटील स्पर्धेचे निरीक्षक अनिल सपकाळ, स्पर्धा संचालक दीपक होले, राज्य ज्यूदो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.
निकाल :
मुले : ८१ किलो खालील वजन गट :

  • सुवर्णपदक लढत : आदित्य धोपावकर (अहमदनगर) वि. वि. बालाजी एस. (रौप्य : पुणे जिल्हा ज्यूदो असोसिएशन); कांस्यपदक : अंशराज जैस्वाल (क्रीडा प्रबोधिनी) वि. वि. लुकमान तायब (मुंबई); कांस्यपदक :
    विनायक तांबे (ठाणे) वि. वि. अभिषेक सकुंडे (सातारा).
    ९० किलो खालील वजन गट :
  • सुवर्णपदक : प्रदिप गायकवाड (सोलापूर) वि. वि. आकाश घोडके (रौप्य : अहमदनगर); कांस्यपदक : यश काबंळे (पुणे जिल्हा ज्यूदो असोसिएशन) वि. वि. सुरज शिंद (पुणे ज्यूदो असोसिएशन); कांस्यपदक : हर्षवर्धन –(कोल्हापूर) वि. वि. मानसोन डिसूजा (सिंधुदुर्ग)
  • १०० किलो खालील वजन गट : सुवर्ण : आदित्य पाटील (कोल्हापूर); रौप्य : हितेन बुटोला (ठाणे); कांस्य : प्रसाद निंबाळकर (उस्मानाबाद);
  • ७८ किलो खालील वजन गट : सुवर्ण : दिव्या करडेल (नाशिक); रौप्य : सायली विजेश (ठाणे); कांस्य : सुमेधा पठारे (औरंगाबाद). ;
  • ७८ किलो वरील वजन गट : शांभवी कदम (मुबंई); रौप्य ; अपूर्वा पाटील (ठाणे); कांस्य : सानिका गायकवाड (कोल्हापूर).
  • गुरूवारी रात्री उशिरा झालेल्या लढती :
    ५७ किलो खालील वजन गटात : आश्विनी सोलंके (क्रीडा प्रबोधिनी) वि. वि. कुमुदिनी सावंत (कोल्हापूर) ; कांस्यपदक : वैष्णवी फलाणे (नाशिक) वि. वि. गंधाली शिधये (पुणे ज्यूदो संघटना); कांस्यपदक : मधुरा कुलकर्णी (नागपूर) वि. वि. पारूल खरे (गोंदिया).
    ७० किलो खालील वजन गटात : समिक्षा शेलार (क्रीडा प्रबोधिनी ) वि. वि. प्रतिक्षा बोरकर (ठाणे); कांस्यपदक : ज्योती यादव (जळगांव ) वि. वि. मिलानी गाजिलकर (मुंबई); कांस्यपदक : तनूजा वाघ (नाशिक) वि. वि. अंजली खत्री (कोल्हापूर).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading