इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसतर्फे ‘महाकॉन २०२२’ परिषदेचे आयोजन

पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस'(आय आय ए) च्या महाराष्ट्र चॅप्टर आणि पुणे केंद्राच्या वतीने २९ आणि ३० एप्रिल रोजी २४व्या ‘महाकॉन २०२२’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बाणेर येथील बंतरा भवन येथे ही परिषद होणार आहे.<br>या परिषदेची संकल्पना ‘ट्रान्झिशन- इनोव्हेट, इम्प्लिमेंट, अडोप्ट ही असून, अहमदाबाद येथील एच सी पी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे बिमल पटेल, नवी दिल्ली येथील मोर्फोजेनेसीसच्या सोनाली रस्तोगी, पुण्यातील सुमनशिल्प’चे महेश नामपूरकर, मुंबईच्या फोल्डस डिझाइन स्टुडिओ’चे कृष्णा मुर्थी असे वास्तूविशारद क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, परिषदेच्या ठिकाणी देखील वास्तुविशारद आणि विद्यार्थी यांना नावनोंदणी करता येणार आहे.

 

 

 

One thought on “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसतर्फे ‘महाकॉन २०२२’ परिषदेचे आयोजन

  • April 27, 2022 at 11:08 am
    Permalink

    Where to register for mahacon 2022

    Reply

Leave a Reply

%d bloggers like this: