fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पुण्यातील महीला उद्योजिकांचे कार्य प्रेरणादायी- सौरभ राव विभागीय आयुक्त

पुणे : लवळे गावाला विकासाची आणि समृद्धीची नवी दिशा दाखवून पुण्यातील महिला उद्योजिकानी अतिशय प्रेरणादायी कार्य करून समाजासाठी नवा आदर्श निर्माण केल्याचे मत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केले .

लवळे गाव फिक्की महिला आघाडीने दत्तक घेतल्यानंतर आज वसुंधरा दिनानिमित्त वृक्षरोपण,गावातील शाळेला संगणक लॅब ,शालेय साहित्य ,आकर्षक बेंचेस ,व इतर साहित्य लोकार्पण त्याचप्रमाणे गावातील व परिसरातील महिलांना लघु उद्योग व्यवसाय करण्यासाठी कौशल्य विकास भवन व उद्योग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र ,गावातील कचरा संकलन करण्यासाठी ओला सुका कचऱ्याची घंटागाडी,विविध सोयींनी युक्त स्मशानभूमी यासह गावातील विविध विकास योजनांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते .
राव पुढे म्हणाले की ,कोणताही विकास होत असताना लोकसहभाग महत्त्वाचा आहे .शासन विविध योजना राबवित आहे .परंतु त्यातूनही काही राहिले तर समाजातील दानशूर लोक ,उद्योजक आपला मोठेपणा दाखवून ते कार्य करतात त्याबाबत त्यांनी फिक्की महीला आघाडीच्या अध्यक्षा निलम सेवलेकर , ऑक्सफर्ड गोल्फ क्लब चे अनिल सेवलेकर व महीला उद्योजक यांचे मनःपूर्वक आभार मानून कौतुक केले .
गावातील प्रत्येकाचा शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकासाठी सामाजिक संस्थेबरोबर उद्योजकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी केले. शासनाकडून काही काम राहिल्यास पुर्णत्वास नेण्यासाठी ऑक्सफर्ड गोल्फ रिसोर्ट, फिक्की फ्लो आणि फ्लेम विद्यापीठ प्रयत्न करीत असून विकासरथ पुढे घेऊन जात असल्याचे कौतूक यावेळी राव यांनी केले.
प्रास्ताविकात येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील अजून 50 दुर्लक्षित गावे दत्तक घेण्याचा संकल्प फिक्की महिला अध्यक्षा निलम सेवलेकर यांनी आज जाहीर केला .
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की ,पुण्यातील लोक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात .तसेच फिक्की ,ऑक्सफर्ड रिसोर्ट , फलेम विद्यापीठ या संस्था अतिशय उत्तम सामाजिक कार्य करतात त्यांच्या पाठीशी आम्ही राहू त्यांना योग्य सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
ऑक्सफर्ड गोल्फ रिसोर्ट चे संचालक अनिल सेवलेकर यांनी गावात रबिण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली 

या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव ,पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , फिक्की महिला आघाडी अध्यक्ष निलम सेवलेकर , ऑक्सफर्ड गोल्फ रिसोर्टचे संचालक अनिल सेवलेकर, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण ,महीला बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोटे ,गटविकास अधिकारी संदीप जठार ,सरपंच निलेश गावडे ,उद्योजक नाथाभाऊ राऊत ,फिक्की महिला आघाडीच्या उपाध्यक्ष रेखा मगर ,पिंकी राजपाल ,खजिनदार सोनिया राव ,अनिता अग्रवाल,पूनम खोच्चर ,उषा पूनावाला ,सुजाता सबनीस यासह पुणे विभागाच्या फिक्की महिला पदाधिकारी ,ग्रामस्थ व स्थानिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading