fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

इंडियाज बेस्ट इम्युनिटी एक्सपर्ट डाबर विटाने मुलांसाठी आयोजीत केले इम्युनिटी सेशन

पुणे : शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत आणि नवीन शैक्षणिक सत्र सुरू आहे. अश्यातच हाऊस ऑफ डाबरमधील आघाडीच्या हेल्थ फूड ड्रिंक डाबर विटा ने आज एक मेगा इम्युनिटी अवेयरनेस कॅम्पेनिंग सुरू करण्याची घोषणा केली. सशक्ततेच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे, शाळेत जाणाऱ्या मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढवणे हा या कॅम्पेनिंगचा उद्येश्य आहे. एसव्हीएस हायस्कूलमधील ३०० हून अधिक मुलांचा समावेश असलेल्या विशेष सत्रासह पुण्यात या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ज्यात मुलांना मूलभूत स्वच्छता आणि पौष्टिक आहाराद्वारे त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्ग शिकवण्यात आले. या विद्यार्थ्यांना डाबर विटा आणि डाबर च्यवनप्राश यांचा समावेश असलेले विशेष रोगप्रतिकार किट देखील प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना प्रशांत अग्रवाल, मार्केटिंग हेड- हेल्थ सप्लिमेंट्स, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले, “आता शाळा सुरू झाल्यापासून, मजबूत प्रतिकारशक्ती ही प्रत्येक मुलाची प्राथमिक गरज आहे कारण आपण अद्याप साथीच्या आजारातून बाहेर पडलेलो नाही. साथीच्या आजारादरम्यान आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, विषांणूंशी लढण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्तीचे महत्व लक्षात घेणे गरजेचे आहे. डाबर विटा ने आजारांविरुद्ध लढण्यासाठी, मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी भारतातील कोलकाता, पुणे, मुंबई, चेन्नई आणि लखनौ या पाच शहरांमधील आघाडीच्या एनजीओ/शाळांसोबत हातमिळवणी केली आहे.

डॉ. राजेश के औटी म्हणाले, “ आपण दररोजच संभाव्य हानिकारक जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कात असतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती या हानिकारक सूक्ष्मजंतूंपासून तसेच काही रोगांपासून आपले संरक्षण करते. सामान्य बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे हा एक प्रभावी मार्ग आहे. या उपक्रमाद्वारे, लहान मुलांना रोगप्रतिकार शक्ती किट पुरवण्यात आले, मजबूत प्रतिकारशक्तीचे महत्व अधोरेखित करणे हे आमचे ध्येय आहे.”

अग्रवाल पुढे म्हणाले.नील्सनने केलेल्या अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की ८८% माता हेल्थ ड्रिंकमध्ये रोगप्रतिकार शक्ती शोधतात. ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊन, डाबरने बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही आरोग्य पेयापेक्षा उत्तम प्रतिकारशक्ती प्रदान करण्यासाठी डाबर विटाटो तयार केले आहे. हे अश्वगंधा, गिलॉय आणि ब्राह्मी यांसारख्या ३० हून अधिक औषधी वनस्पतींच्या अद्वितीय मिश्रणाने बनवलेले आहे, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की हे ड्रिंक केवळ चांगली प्रतिकारशक्तीच नाही तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीस प्रोत्साहन देते. डाबर विटा एक चवदार चॉकलेटी पेय आहे ज्यात आयुर्वेदाचे फायदे आहेत, जे हाड आणि स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि ६ ते १५ वर्षांच्या मुलांचे मेंदूचे आरोग्य उत्तम ठेऊन शिकण्यात आणि एकाग्रता वाढविण्यात मदत करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading