अमोल मिटकरींवर त्वरित गुन्हा दाखल करावा – भाजप
पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष कुणाल शैलेश टिळक ह्यांनी संभाजी पोलीस चौकी येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार अमोल मिटकरी ह्यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. अमोल मिटकरी ह्यांनी इस्लामपूर येथे जाहीर सभेत जाणूनबुजून हिंदू धर्माचा व ब्राह्मण समाजाचा अपमान केला. समाजात तेढ निर्माण करण्याची प्रवृत्ती हि अमोल मिटकरींची पाहिल्या पासूनच आहे. हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘कन्यादान’ ह्या विधीचा अपमान करत त्यांनी प्रत्येक स्त्री चा अपमान पण केला आहे. त्यामुळे त्यांच्या वर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती या तक्रार अर्जामध्ये केली आहे. तसेच अमोल मिटकरींवर त्वरित गुन्हा दाखल करावा आणि कायदेशीर कारवाई करावी अशीही विनंती तक्रार अर्जामध्ये केलेली आहे.
![](https://i0.wp.com/maharashtralokmanch.com/wp-content/uploads/2022/04/img-20220422-wa00471016434015747276521.jpg?resize=700%2C1024&ssl=1)
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर, भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष अमित कंक, सरचिटणीस प्रणव गंजीवाले, केदार मानकर, शंतनू कांबळे, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस सुनील मिश्रा, प्रशांत सुर्वे, मयंक पवार, चेतन मुंढे, योगेश खाटपे, जयदीप पारखे, स्वयम बारटक्के, तेजस जाधव, सिद्धेश पांडे, यश राजपूत व अॅड. प्रतीक राजोपाध्ये आणि अॅड. आशिष पाटणकर उपस्थित होते.