पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यामध्ये सरकारचा रात्रीस खेळ चाले – आशिष शेलार

पुणे:दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने पोलीस खात्यात बदल्या केल्या आहेत त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यामध्ये सरकारचा रात्रीस खेळ चाले असे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत वक्तव्य केले.

आशिष शेलार म्हणाले, विनाकरण निर्णय बदलेले जात आहेत. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? यात देखील कोणी दलाल आहेत का? असे सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे इथला ‘मातोश्री’ निवासस्थाना बाहेर येऊन हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
याला शिवसेना विरोध का करत आहे. शिवसैनिक कायदा का हातात घेत आहेत असा सवाल शेलार यांनी केला.

राणा दाम्पत्य काही आतंकवादी आहेत का? हनुमान चालीसा म्हणणं चुकीचं आहे का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. शर्गील उस्मान आला होता तेव्हा तुम्ही कुठं होता, असेही शेलार म्हणाले.
मंदिरातल्या भोंग्या विषयी जो राज्यात वाद सुरू आहे त्यावर आशिष शेलार म्हणाले, भोंगे, हनुमान चालीसा या सगळ्यांना वीज लागणार आहे. बाकीच्यांना यावर लक्ष द्यायला वेळ नाही पण भाजप
यावर लक्ष ठेवून असल्याचे शेलार यांनी सांगितले. अनधिकृत भोंग्यावर कारवाई झालीच पाहिजे. जर सरकारने अनधिकृत भोंग्याना अधिकृत करण्याचा प्रयत्न केला तर जशास तशे उत्तर देऊ असेही शेलार म्हणाले. हनुमान चालीसा कार्यक्रम झाले तर त्याचे स्वागतच आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: