महा एनजीओ फेडरेशन यांच्या वतीने क्लीन अँड सायन्स यांच्या सीएसआर प्रकल्प अंतर्गत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे : महा एनजीओ फेडरेशन वतीने आणि क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या सीएसआर प्रकल्पाअंतर्गत माय माउली केअर सेंटर या वृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्थेस आधुनिक सुविधांनी युक्त रूग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेमुळे पुणे व परिसरातील शेकडो गरजू, वृद्ध रुग्णांना मोठी मदत होणार आहे .

क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब यांच्या हस्ते आणि महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत कात्रज येथे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माय माऊली केअर सेंटरचे संचालक विकास मुंदडा, निर्मला मुंदडा, विठ्ठल वरुडे पाटील, विकास वरुडे पाटील , श्रीरामबिलास मुंदडा, डॉ.कांतीलाल मुंदडा, प्रकाश मुंदडा तसेच फेडरेशनची संचालक समिती मुकुंद शिंदे, गणेश बाकले, अमोल उंबरजे, राहुल पाटील व स्व. राजेंद्र रामबीलास मुंदडा संस्थेचे दर्शन मुंदडा, योगेश बजाज, कैलास सिकची, राहुल बूब उपस्थित होते.

शेखर मुंदडा म्हणाले, महा एनजीओ फेडरेशन मागील अनेक वर्षांपासून समाजिक स्वयंसेवी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहे. आज महाराष्ट्रातील २ हजारापेक्षा अधिक एनजीओ महा एनजीओ फेडेरेशन सोबत संलग्न आहेत.

प.पू. गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांच्या आशीर्वादाने व चंद्रकांत राठी यांच्या मार्गदर्शनाने प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य सेवा , पर्यावरण व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, अपंग व विकलांग, कृषी जल व्यवस्थापन, अनाथ आश्रम, अध्यात्मिक, व्याधीग्रस्त समाजासाठी कार्य, कायदेशीर सल्ला, गो सेवा, सामजिक जनजागृती, कौशल्य विकास, वृद्धाश्रम, वंचित मुलांचे पुनर्वसन, उद्योजकता व रोजगार निर्मिती, नदी स्वछता, व्यसनमुक्ती, योग विज्ञान या क्षेत्रात महा एनजीओ फेडरेशन कार्य करत आहे.येत्या काळात महाराष्ट्रातील एनजीओना सीएसआर अंतर्गत समाज उपयोगी सेवा उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

कृष्णकुमार बूब म्हणाले, महा एनजीओ फेडरेशन व स्व. राजेंद्र रामबीलास मुंदडा धर्मादाय संस्था यांचे कार्य महत्त्वपूर्ण व समाज उपयोगी आहे. त्यामुळे यापुढेही आपल्या मदतीस आम्ही सदैव सोबत आहोत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: