अनधिकृतपणे लिफ्टची देखरेख आणि दुरुस्ती केल्याबद्दल पुण्यातील ओलंपिया एलिव्हेटर्स प्रायव्हेट लिमिटेड वर गुन्हा दाखल.

पुणे: आंतरराष्ट्रीय नामवंत लिफ्ट कंपनीने पुण्यातील ओलंपिया एलिव्हेटर्स प्रायव्हेट लिमिटेड वर लिफ्टची देखभाल करण्यासाठी बेकायदेशीरपणे स्पेअर पार्ट्स खरेदी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा ओलंपिया एलिव्हेटर्स कंपनीचे संचालक शिवराम कुंभारकर आणि रुपाली शिवराम कुंभारकर यांच्याविरुद्ध हैदराबादच्या महांकाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंड संहिताचे कलम ४०६, ४०९, ४२०, १२०ब r/w ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. ओलंपिया एलिव्हेटर्स या कंपनीने जागतिक दर्ज्याच्या कंपनीची मूळ उपकरणे वापरून  अनधिकृतपणे लिफ्ट्सची देखरेख आणि सेवा दिली. यासाठी मूळ उपकरणे बनविणार्‍या कंपनीकडून बेकायदेशीर खरेदी आणि चुकीचा विनियोग केल्याचा आरोप तक्रारीत केलेला आहे.

बेकायदेशीरपणे स्वस्त दरात लिफ्टची दुरुस्ती करुन केवळ व्यवहारच खराब होत नाहीतर लिफ्ट वापरणार्‍या प्रत्येकाच्या जीवाशी खेळ होतो. दुर्देवाने असे व्यवहार करणारे आणि ग्राहक देखील नकळतपणे या गुन्ह्यात सहभागी होतात. मूळ उपकरणे उत्पादन करणार्‍या कंपन्या अधिकृतपणे त्यांच्या ग्राहकांसाठी सुटे स्पेअरपार्ट विकण्यासाठी तयार असतात त्यावेळी ग्राहकांनीदेखील गुणवत्ता तपासून व्यवहार करणे सर्वांच्या हिताचे ठरते. त्यामुळे ग्राहकांनीदेखील बेकायदेशीर व्यवहारामध्ये न अडकता गुणवत्तापूर्ण व्यवहार करुन सर्वांच्या हिताचा विचार करणे करणे गरजे असल्याचे आंतरराष्ट्रीय कंपनीचे म्हणणे आहे.

 

छायाचित्र प्रतीकात्मक आहे 

Leave a Reply

%d bloggers like this: